तरुण भारत

मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम सुरू

गणपत गल्ली परिसरात पकडली जनावरे

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

शहरामध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढल्यामुळे नागरिक तसेच व्यापाऱयांना त्रास सहन करावा लागत आहे.  त्यामुळे अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत महापालिकेच्या कर्मचाऱयांनी गुरुवारी गणपत गल्ली परिसरात काही मोकाट जनावरांना पकडले आहे. त्यानंतर त्या जनावरांना गोशाळेमध्ये पाठवून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

कोरोनामुळे बाजारपेठेतील तसेच रस्त्यांवरील रहदारी कमी झाली आहे. त्यामुळे आता जनावरे पकडणे सोपे झाले असून त्यासाठी मोहीम मनपाने उघडली आहे. गुरुवारी गणपत गल्ली, रविवारपेठ या परिसरातील मोकाट जनावरांना पकडून त्यांची रवानगी गोशाळेत करण्यात आली आहे.

ही जनावरे पकडताना कर्मचाऱयांना मोठी कसरत करावी लागत होती. मात्र बाजारपेठेमध्ये गर्दी नसल्यामुळे जनावरांना पकडणे सोयीस्कर झाल्याचे कर्मचाऱयांनी सांगितले.

Related Stories

थकीत भाडे वसुलीसाठी गाळय़ांना ठोकले टाळे

Patil_p

जुन्या धारवाड रोडवरील सर्व्हिस रस्त्यावरील लोखंडी सळय़ा उघडय़ावर

Amit Kulkarni

व्हीटीयू सुरू करणार तीन नवीन अभ्यासक्रम

Patil_p

अपहरण करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Rohan_P

अतिवाड मराठी शाळेत स्वच्छतागृह बांधकामाचा शुभारंभ

Amit Kulkarni

जि.पं.मुख्य कार्यकारी अधिकाऱयांकडून तलावांची पाहणी

Patil_p
error: Content is protected !!