तरुण भारत

रविवार पेठ बनले क्रिकेटचे मैदान

प्रतिनिधी / बेळगाव

सध्या रविवारपेठेत क्रिकेट खेळण्यात येत असल्याचे सांगितल्यानंतर कुणालाही खरे वाटणार नाही. कारण रविवारपेठत नेहमी वाहनांचा संचार असतो तसेच नागरिक व व्यापाऱयाची गर्दी असते. पण सध्या शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने क्लोजडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे येथे फक्त दुपारपर्यंत वाहनाची वर्दळ असते. तर सायंकाळच्यावेळी येथील तरुण मंडळी रविवारपेठेतील रस्त्यावर क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत आहेत.

Advertisements

रविवार पेठ ही शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. ब्रिटिश काळापासून प्रसिद्ध असलेल्या रविवार पेठेतील रस्ते कधीच निर्मनुष्य नसतात. येथे  नेहमी वाहनांची गर्दी आणि व्यापाऱयांची वर्दळ असते. त्यामुळे  हा परिसर कधीच शांत नसतो.याठिकाणी लॉकडाऊन काळात रविवार पेठेत काहीशी शांतता होती. सध्या क्लोजडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी मुभा दिली आहे. यामुळे रविवारपेठेत गर्दी होत आहे. पण दुपारी 12 नंतर क्लोजडाऊननंतर रस्त्यावरील गर्दी पूर्णपणे कमी होत आहे. काही तरुण मंडळी रविवारपेठेतील रस्त्यांवर क्रिकेटचा आनंद घेताना आढळून आली.

Related Stories

होनगा येथील मंदिरांच्या ट्रस्टी- पुजाऱयाची चौकशी करा

Patil_p

कॉंग्रेसने राज्य सरकारवर साधला निशाणा; परिस्थिती हाताळण्यात अपयश

Shankar_P

दुसऱया मजल्यावरुन पडून हिंडलगा येथील तरुणाचा मृत्यू

Patil_p

बेकिनकेरेत गल्लोगल्ली गटारी तुंबल्याने दुर्गंधीचे साम्राज्य

Amit Kulkarni

कल्याण प्रकरणातील गंगा कुलकर्णीची आत्महत्या

Rohan_P

टायर गँग पुन्हा सक्रिय; 9 जणांवर ‘कोका’

Rohan_P
error: Content is protected !!