तरुण भारत

बॉक्साईट रोडवर धोकादायक खड्डा

कुवेंपुनगर ते विद्यानगर बसस्टॉपपर्यंतचे रुंदीकरण रखडले : नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

बॉक्साईट रोड शेजारी विविध उपनगरे असल्यामुळे या रस्त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने आणि महापालिकेने या रस्त्याचे रुंदीकरण करून विकासकामे राबविली आहेत. यापैकी काही रस्त्यांचा विकास स्मार्टसिटी योजने अंतर्गत करण्यात येत आहे. मात्र सह्याद्रीनगर परिसरातील खड्डा बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

हिंडाल्को ते हिंडलगा फॉरेस्ट चेकपोस्टपर्यंतचा रस्ता बॉक्साईट रोड म्हणून ओळखला जातो. बॉक्साईट वाहतूक करणारी अवजड वाहने या रस्त्याचा वापर करीत असतात. पण बॉक्साईट वाहतूक बंद झाल्याने रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले होते. पण अलिकडे या रस्त्याशेजारी विविध उपनगरे वसविण्यात आली असल्याने रस्त्याचे महत्त्व वाढले आहे. तसेच रस्त्यावर वर्दळ देखील वाढली आहे. त्यामुळे महापालिकेकडून रस्त्याची देखभाल करण्यात आली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याचे चार टप्प्यात रुंदीकरण केले आहे. हिंडाल्को, वैभव नगर ते विद्यानगरपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करून डांबरीकरण करण्यात आले आहे. तसेच फॉरेस्ट चेकपोस्ट ते कुवेंपुनगरपर्यंतच्या रस्त्याचे दोन टप्प्यात रुंदीकरण करण्यात आले आहे. तसेच दुभाजक निर्माण करण्यात आले आहे. महापालिका हद्दीतील रस्त्यावर पथदिपांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र कुवेंपु नगर ते विद्यानगर बसस्टॉपर्यंतच्या अवघ्या पाचशे मीटर रस्त्याचे काम रखडले आहे.

या रस्त्याची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत.  कुवेंपुनगर परिसरात रुंदीकरण संपलेल्या ठिकाणी भला मोठा खड्डा निर्माण झाला आहे. पथदीप नसल्याने रात्रीच्यावेळी खड्डा असल्याचे निदर्शनास येत नाही. त्यामुळे याठिकाणी वाहनांचे अपघात घडत आहेत. दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना हा खड्डा जीवघेणा बनला आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रार केली असता, रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. पण सध्या निधी नसल्याने रस्त्याचे काम हाती घेण्यात आले नसल्याचे सांगण्यात येत
आहे. पुढील टप्प्यात उर्वरित रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण सध्या येथील खड्डा बुजविणे अत्यावश्यक आहे. पण यासाठीही सार्वजनिक बांधकाम खात्याकडे निधी उपलब्ध नाही का? अशी विचारणा नागरिक करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांनी याकडे लक्ष द्यावे व रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे.

Related Stories

गोहत्या बंदी विधेयक संमत झाल्याने कारवार जिल्हय़ात आनंदोत्सव

Patil_p

जीवनावश्यक वस्तू निर्मिती करणारे उद्योग सुरू

Amit Kulkarni

कार्तिक पौर्णिमेनिमित्त लक्ष दीपोत्सव

Patil_p

जायंट्स सखीतर्फे एड्सबाधित मुलांना औषधे-कपडय़ांचे वाटप

Patil_p

कॅन्टोन्मेंट गाळय़ांच्या भाडे कराराची मुदत वाढविण्याची मागणी

Patil_p

काहेर विद्यापीठातर्फे वेबिनार

Amit Kulkarni
error: Content is protected !!