तरुण भारत

गुरुवारी बेळगाव जिल्हय़ात तब्बल 1604 रुग्ण पॉझिटिव्ह

तालुक्मयातील 392 जणांचा समावेश, शहरातही रुग्णसंख्येत वाढ

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

बेळगाव जिल्हय़ात गुरुवारी कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांकी आकडा गाठला आहे. तब्बल 1604 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून यामुळे आरोग्य खाते पुन्हा खडबडून जागे झाले आहे. क्लोजडाऊन आणि कर्फ्यू लागू करुन त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. येत्या काही दिवसात याहून अधिक उच्चांकी आकडा गाठण्याची भीती देखील आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.

सर्वसामान्य नागरिकांचे हाल होवू नये यासाठी लॉकडाऊनऐवजी क्लोजडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळी 6 ते 12 पर्यंत खरेदी करण्यास मुभा देण्यात आली. मात्र याचा गैरफायदा काही लोक घेत आहेत. त्याचाच फटका आता पुन्हा बसताना दिसत आहे. जनतेने सावध झाले नाही तर पुन्हा लॉकडाऊन शिवाय पर्याय उरणार नाही. अशी सध्याची परिस्थिती आहे.

गुरुवारी जिल्हय़ामध्ये 1604 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 392 जणांचा समावेश आहे. शहरातील 331 जण तर ग्रामीण भागातील 61 जणांचा त्यामध्ये समावेश आहे.

 दुसऱया लाटेमध्ये जिल्हय़ात सर्वात जास्त रुग्ण गुरुवारी आढळले आहेत. 

अनगोळ, टिळकवाडी, आदर्शनगर, आंबेडकरनगर, आनंदनगर-वडगाव, अनगोळ, अनंतशयन गल्ली, आजमनगर, अंजनेयनगर, खासबाग, बसव कॉलनी, बॉक्साईट रोड, शहापूर, पाईपलाईन रोड, नानावाडी, बिच्चू गल्ली-शहापूर, भातकांडे गल्ली-बेळगाव, बुरुड गल्ली, रेलनगर, चन्नम्मानगर, चव्हाट गल्ली, चौगुलेवाडी, क्लब रोड, शिवबसवनगर, गांधीनगर येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

ग्रामीण भागातील मच्छे, तुरमुरी, पंतबाळेकुंद्री, मारिहाळ, मुतगा, सांबरा, सावगाव, उचगाव, सुळगा(हिं) या गावांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. शहराबरोबर ग्रामीण भागातही रुग्ण संख्येमध्ये वाढ झाली आहे. इतक्मया मोठय़ा प्रमाणात रुग्ण वाढत असताना जनतेमध्ये मात्र अजूनही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे भविष्यात हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

गुरुवारी एकाचा मृत्यू

कोरोनाने गुरुवारी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता कोरोना बळींचा आकडा 368 वर पोहोचला आहे. तर सध्या 5 हजार 228 जण सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 9 हजार 206 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून त्यामधील 6 लाख 66 हजार 242 जण निगेटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत 36 हजार 336 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामधील 30 हजार 740 जण बरे झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. 5 हजार 228 जणांवर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहेत.

Related Stories

कौटुंबिक वादातून महिलेवर चाकु हल्ला

sachin_m

पाठीचा कणा ताठ ठेवा; क्षणभर ब्रेक घ्या!

Omkar B

परिवहनच्या जानेवारी सिझनवरही पाणी…

Patil_p

गुरूवारी जिह्यात 25 नवे रुग्ण

Patil_p

निलजी-पंढरपूर दिंडी मार्गस्थ

Patil_p

हलगा येथे सापडला 10 फुटी धामण साप

Amit Kulkarni
error: Content is protected !!