तरुण भारत

रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा वेळेत करा!

उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांनी पुन्हा घेतली बैठक : कोरोनाबाबत दक्षता घेण्याची केली सूचना

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

जिल्हय़ातील कोरोनाग्रस्त रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर रेमडेसिवीर इंजेक्शनची तरतूदही वेळेत करावी. सरकारने दिलेल्या मार्गसूचीनुसार काम करावे. त्याचे काटेकोर पालन करावे. डॉक्टरांनी 24 तास सेवा द्यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री आणि जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी अधिकारी व आरोग्य विभागाच्या डॉक्टरांना केली आहे.

कोरोनाचे नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर कठोरात कठोर कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असेही त्यांनी सांगितले. बेळगाव येथील सरकारी विश्रामधाम येथे अधिकाऱयांची बैठक घेवून त्यांनी कोरोनाबाबत प्रत्येकाने काळजी घ्यावी, अशी सक्त ताकीद केली आहे. कोरोना मार्गसूचीचे पालन न करणाऱया अधिकाऱयांवरही कारवाई केली जाईल. ऑक्सिजन पुरवठय़ावर सतत देखरेख ठेवा, खासगी किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये कोणत्याही परिस्थिती ऑक्सिजन कमी पडू देऊ नका, अशी सक्त ताकीद गोविंद कारजोळ यांनी केली आहे.

लसीकरण थांबवू नका

वरि÷ डॉक्टरांनी कोविड वॉर्डांना नियमितपणे भेट द्यावी. कर्मचारी तसेच डॉक्टरांनी 24 तास काम करावे. बेळगावसह गोकाक, सौंदत्ती तालुक्मयामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये झपाटय़ाने वाढ होत आहे. ही बाब गंभीर असून त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली आहे. ज्या व्यक्तींनी पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोस देण्यासाठी प्रथम प्राधान्य द्या. कोणत्याही परिस्थितीत लसीकरण थांबवू नका, असेही पालकमंत्र्यांनी म्हटले आहे.

बिम्समध्ये आणखी एक ऑक्सिजन युनिट

बिम्समध्ये ऑक्सिजन स्टोरेज करण्यासाठी आणखी एक युनिट सादर करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले. बागलकोट व बेळगाव जिल्हय़ामध्ये ऑक्सिजन युनिट स्थापन करण्याबाबत सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला आहे, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी ऑक्सिजन टँकर देखील 24 तास तैनात करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांनी बिम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनय दास्तीकोप यांना सक्त ताकीद देऊन रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घ्या, असे सुनावले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत काळजी घेणे महत्त्वाचे आहे. रुग्णांना बेड उपलब्ध करुन द्या. कक्षात योग्य प्रकारे त्यांची देखरेख घ्या. काम करण्यासाठी स्वतःहून प्राधान्य द्या तेव्हाच रुग्णांची संख्या कमी होवू शकते. कोरोना रुग्णांसाठी रुग्णवाहिकांचा वापर करावा, त्यासाठी नियोजन करुन त्याची नोंदही ठेवावी, असेही यावेळी सांगण्यात आले.

कोरोनाग्रस्तांना वेळेत उपचार मिळणे तसेच त्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्या मांडण्यासाठी आणि सर्वांना माहिती देण्यासाठी वेबसाईट तयार करुन त्या माध्यमातून संपूर्ण माहिती द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

साखर कारखान्यांनाही सूचना

जिल्हय़ातील साखर कारखान्यांनी ऑक्सिजन सिलिंडर पुरविण्यासाठी पुढे यावे. कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करुन द्यावीत. सध्या हॉस्पिटलना कारखान्यांकडील सिलिंडर द्यावेत. सर्व परिस्थिती सुधारल्यानंतर तुम्हाला सिलिंडर परत दिले जातील, असेही त्यांनी सांगितले आहे.

येत्या काही दिवसांत बेळगावात रेमडेसिवीर तयार केले जाईल. त्यामुळे कमतरता भासणार नाही. मात्र सध्या अत्यंत काळजीपूर्वक रेमडेसिवीरचा वापर करावा. असे सांगत कर्मचाऱयांची कमतरता असू नये यासाठी आताच कर्मचाऱयांना सामावून घ्या, त्यांची मदत घेण्यासाठी प्रयत्न करा, असे त्यांनी सांगितले. हेल्पलाईनवर कोणीही माहिती विचारली किंवा मदत मागितली तर त्यांना आवश्यक तो प्रतिसाद तातडीने द्यावा, असेही त्यांनी बजावले आहे.

अजून कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे

जिल्हय़ामध्ये मोठय़ा प्रमाणात कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळत आहेत. सरकारने जारी केलेल्या मार्गसूचीचे पालन सुरू आहे. नियमही कडक पाळण्यात येत आहेत. असे असले तरी अजूनही कठोर नियमांची गरज असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांनी व्यक्त केले.

पोलिसांना प्रथम लस द्यावी

पोलीस रात्रंदिवस सेवा बजावत आहेत. त्यामुळे पोलिसांना प्रथम लस देणे गरजेचे आहे. 100 टक्के लसीकरण पूर्ण करावे, असे यावेळी उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांनी आरोग्याधिकाऱयांना सांगितले आहे. यावेळी बिम्सचे डॉ. विनय दास्तीकोप यांनी हॉस्पिटलमधील करण्यात आलेल्या सोयींची माहिती दिली.

या बैठकीला मंत्री उमेश कत्ती, खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी शशिकांत मुन्याळ, बिम्सचे कार्यकारी संचालक विनय दास्तीकोप यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

सुगी हंगाम साधायचा कसा?

Patil_p

गांजा विकणाऱया रिक्षाचालकाला अटक

Patil_p

इदलहोंड येथे गवतगंजीला आग

Patil_p

पिण्याच्या पाण्यासाठी पाच्छापुरात घागर मोर्चा

Patil_p

स्फोटकांच्या वाहतुकीवर पोलिसांची नजर

Amit Kulkarni

बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गाबाबत चर्चा

Amit Kulkarni
error: Content is protected !!