तरुण भारत

दुचाकी चोरी प्रकरणी दोघा संशयितांना अटक

प्रतिनिधी / पर्वरी

 घराबाहेर रात्रीच्यावेळी उभ्या करून ठेवलेल्या दुचाकी पळविणाऱया दोघा संशयितांना पर्वरी पोलिसांनी अटक केली. संशयितांना न्यायदंडाधिकाऱयांसमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी दिली.  

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 मे रोजी रात्री 8 वा. जीए-03-एसी-4795 ही ऍक्टिवा दुचाकी घराबाहेर उभी करून ठेवली होती. दुसऱयादिवशी स. 7.30 वा. दुचाकी मालकाने पाहिले असता सदर दुचाकी त्या ठिकाणी दिसली नाही, याबाबतची तक्रार नितीन महाले यांनी पर्वरी पोलीस स्थानकान दाखल केली  होती. ही घटना पिळर्ण येथे घडली. तसेच नेरुल येथील बेनी सिल्वेरा यांच्या मालकीची जीए-03-एई-9325 ही होंडा ऍक्टिवा दुचाकी घरासमोर ठेवली होती. ती दुसऱया दिवशी सकाळी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर सिल्वेरा यांनीही पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीनुसार पोलिस स्थानकात अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

दुचाकी पळविणारी टोळी या भागात कार्यरत असल्याने पर्वरी पोलिसांनी सापळा रचून वाहनांची तपासणी मोहीम हाती घेतली. तपासणी मोहिमेदरम्यान पोलिसांनी  महंमद आफ्रोज(वय. 30, सध्या बेती मूळ बिहार) तर लक्ष्मी मुखिया(वय 22 सध्या वेरे, मूळ बिहार)  या दोघांना संशयित म्हणून दुचाकीसह ताब्यात घेऊन अटक केली. दोन्ही संशयितांना म्हापसा न्यांदडाधिकाऱयांसमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी दिली.

पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप परब, संदीप धारगळकर, कॉन्स्टेबल नितेश नाईक, ओमकार व किरण वायंगणकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Stories

फातोडर्य़ातील दुहेरी खुनाने मडगाव हादरले

Amit Kulkarni

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला नागरिकांनी केले स्वच्छ

Amit Kulkarni

दाबोळी विमानतळावर देशी पर्यटकांचा ओघ

Patil_p

कोळशाचे कण गोव्याच्या समुद्रकिनाऱयावर

Omkar B

गोव्यात आजपासून इफ्फीला सुरुवात

Shankar_P

मुसळधार पावसामुळे सत्तरी तालुक्मयात नैसर्गिक पडझड

Omkar B
error: Content is protected !!