तरुण भारत

सुरू असलेले चित्रपट शूटिंग बंद

वाढत्या कोरोनामुळे घेतला निर्णय : काही मालिकांचे चित्रीकरण पुन्हा रखडलं

प्रतिनिधी / मडगाव

Advertisements

गोव्यात कोरोना महामारी वाढल्याने सरकारने बुधवारी गोव्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या मराठी मालिकांचं तसेच रिऍलिटी शोचं चित्रिकरण बंद करण्याचा निर्णय घेतला. जर कुठेही चित्रिकरण सुरू असले तर त्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांना देण्यात आलेले आहेत. गोव्यात सुरू असलेले चित्रिकरण अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याची गोवा मनोरंजन सोसायटीचे अध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी दिली आहे.

देशात करोनाचा उदेक वाढू लागला आहे. अशात महाराष्ट्रात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकराने चित्रिकरणावर बंदी आणली होती. यानंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडू नये, यासाठी अनेक मराठी मालिकांचं तसचं रिअ‍ॅeलिटी शोचं चित्रीकरण राज्याबाहेर गोवा, दमण, सिल्वासा या ठिकाणी सुरू करण्यात आले होते. गोव्यात एकूण 30 चित्रिकरणांसाठी गोवा मनोरंजन सोसायटीने मान्यता दिली होती. ही मान्यता देताना कोरोना महामारीच्या सर्व मार्गदर्शन तत्वाचे पालन करण्याची अट घातली होती. सर्व शुटिंग हे इनडोअर होते. आऊटडोअर शुटिंगला मान्यता दिलेली नव्हती असे श्री. फळदेसाई म्हणाले. 

दरम्यान, बुधवारी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी मडगावच्या रवींद्र भवनातत सुरू असलेल्या ‘सूर नवा ध्यास नवा’ रिऍलिटी शोच्या ठिकाणी घुसून  शूटिंग बंद करण्यास भाग पाडले. यावेळी या रिऍलिटी शोच्या प्रमुखाने आवश्यक असलेले सर्व परवाने घेण्यात आल्याची माहिती आमदार श्री. सरदेसाई यांना दिली. परंतु, त्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. संगीतकार व गायक कलाकार अवधुत गुप्ते यांनी ही देखील श्री. सरदेसाई यांच्याकडे चर्चा केली. मात्र, त्यांनी अशा शुटिंगमुळेच कोरोनाचा फैलाव होत असल्याचे सांगून शुटिंग त्वरित बंद करण्यास सांगितले.

विजय सरदेसाईच्या पूर्वीच बंदीचा निर्णय झाला होता

sगोव्यात सुरू असलेल्या मालिकांचं चित्रिकरण तसेच रिऍलिटी शो चित्रिकरण बंद करण्याचा निर्णय सरकारने बुधवारीच घेतला होता. गोव्यात इनडोअर मध्ये शुटिंग सुरू असल्याने त्याचा जनतेला कोणताच त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन मान्यता दिली होती. परंतु, गोव्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने सरकारला सर्व चित्रिकरण बंद करणे भाग पडले. जेव्हा सरकारने हा निर्णय घेतला, त्याची माहिती विजय सरदेसाई यांना मिळाली असावी व त्यांनी श्रेय घेण्यासाठी रवींद्र भवनमध्ये घुसून ‘सूर नवा ध्यास नवा’चे चित्रिकरण बंद पाडले असावे असे सुभाष फळदेसाई म्हणाले.

ही सुद्धा एक इंडस्ट्री

आज देशात अनेक इंडस्ट्री कार्यरत आहेत. त्याच प्रमाणे फिल्म सुद्धा ही एक इंडस्ट्री आहे. या ठिकाणी काम करणाऱयांना वेतन मिळते, त्यावर त्याची रोजी रोटी चालते. अनेक कलाकारांना संधी मिळत असेत. आज गोव्यातील कलाकार सुद्धा या क्षेत्रात चमकत आहे. अशा वेळी या इंडस्ट्रीवर अन्याय होऊ नये हीच सरकारची भूमिका असल्याने गोव्यात चित्रिकरणाला मान्यता दिली होती असे सुभाष फळदेसाई म्हणाले. केवळ कोरोनाचे प्रमाण वाढल्याने सरकारला हे चित्रिकरण बंद करणे भाग पडल्याचे त्यांनी सांगितले. कलाकारांचा आदर करायला प्रत्येकाने शिकले पाहिजे असेही ते म्हणाले.

वैफल्यग्रस्त झाल्यानेच चित्रिकरण बंद पाडले

रवींद्र भवनमध्ये ‘सूर नवा ध्यास नवा’ या रिऍलिटी शोचे चित्रिकरण्यास मान्यता देताना सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आले होते. हे चित्रिकरण मान्यतेनेच सुरू होते. पण, हल्लीच झालेल्या पालिका निवडणुकीत गोवा फॉरवर्डला फटका बसला होता. त्यामुळे विजय सरदेसाई हे वैफल्यग्रस्त झाले होते म्हणूनच त्यांनी रवींद्र भवनमध्ये घुसून शुटिंग बंद पाडल्याचा आरोप रवींद्र भवनचे अध्यक्ष दामू नाईक यांनी केला आहे.

या मालिकांचं शूटिंग पुन्हा रखडलं !

मुंबईत शूटिंगवर बंदी आणल्यानंतर ‘आई माझी काळू बाई’, ‘रंग माझा वेगळा’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ,अग्ग’बाई सूनबाई, अशा अनेक मालिकाचं तसंच ‘सूर नवा ध्यास नवा’ या रिअ‍ॅeलिटी शोचं शूटिंग गोव्यात सुरु होतं. सर्व प्रकारची काळजी घेत हे चित्रीकरण सुरू होतं. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हे चित्रीकरण बंद करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातत सुरू असलेलं मराठी मालिकांचं शूटिंग बंद करण्यात आल्यानंतर अनेक निर्मात्यांनी गोव्याची वाट धरली होती. मधल्या काळात जवळपास आठवडाभर काही मालिकांचे पुन्हा जुने भाग दाखवण्यात आले होते. गोव्यात शूटिंग सुरू झाल्याने प्रेक्षकांना त्याच्या आवडत्या अनेक मालिकांचे नवे भाग पाहण्याची संधी उपलब्ध झाली होती. मात्र आता पुन्हा चित्रिकरणात खंड पडल्याने अनेक निर्मात्यांपुढे पेच निर्माण झालाय.

Related Stories

साखळी नगराध्यक्ष अविश्वास ठराव सहमत

Omkar B

बारावीची परीक्षा रद्द करु नका

Omkar B

…तर खाणींचा लिलाव केंद्र करणार

Amit Kulkarni

स्थलांतरित मालमत्तेतील घरमालकांना मिळाले हक्क

Patil_p

कर्मचारी कोरोनाबाधित आढळला काणकोण पालिका दोन दिवस बंद

Patil_p

सोमवारी कोरोनाचा एक बळी, 112 नवे बाधित

Patil_p
error: Content is protected !!