तरुण भारत

अनुष्का आणि विराट कोहलीकडून कोरोनाबाधितांना 2 कोटी रुपयांची मदत

  • #InThisTogether या नावाने एक फंड सुरू


ऑनलाईन टीम / मुंबई :


देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः रौद्र रूप धारण केले आहे. दैनंदिन रुग्ण संख्या आता चार लाखांचा टप्पा ओलांडत आहे. त्यामुळे अनेकांनी आतापर्यंत कोरोनाबाधितांना मदत केली आहे. त्यातच आता अनुष्का आणि विराट कोहली या जोडप्याने कोरोनाबाधितांना मदत म्हणून दोन कोटी रुपये दिले आहेत. 

Advertisements


मिळालेल्या अधिक माहितीनुसार, यासोबतच या दोघांनी कोरोनाबाधितांना मदत म्हणून एक फंड उभारायला सुरुवात केली असून Ketto या नावाच्या प्लॅटफॉर्मवर #InThisTogether या नावाने एक फंड उभारायला सुरु केले आहे. या फंडच्या माध्यमातून विराट आणि अनुष्काने सात कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष ठेवले आहे. 

विराट कोहली आणि अनुष्का शर्माने यावर एक निवेदन देखील जारी केले आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, #InThisTogether या नावाने हे अभियान सात दिवस चालेल. या अभियानाच्या माध्यमातून जे काही पैसे जमा होतील ते ACT ग्रांट्स नावाच्या एका संस्थेला देण्यात येतील. या फंडच्या माध्यमातून ऑक्सिजनचा पुरवठा तसेच इतर अनेक प्रकारच्या साहित्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. 


आपला देश आता एका मोठ्या संकटातून वाटचाल करत असून या वेळी आपण एकत्र आले पाहिजे आणि लोकांचे जीव वाचवले पाहिजेत. त्यामुळे या अभियानात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन विराट कोहलीने केले आहे. तर या फंडच्या माध्यमातून कोरोनाबाधितांना लढण्यास मदत मिळेल अशी आशा अनुष्का शर्माने व्यक्त केली आहे. 

Related Stories

परमबीर सिंग एनआयएच्या कार्यालयात दाखल

triratna

रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाचा टॅक्सीचालकावर बलात्कार

prashant_c

नवनीत राणा दाखल करणार अरविंद सावंतांविरुद्ध गुन्हा

triratna

९ जानेवारी रोजी ‘गांधी शांती यात्रा’ पुण्यात

prashant_c

कोरोनाचा उद्रेक : महाराष्ट्रात 23,350 नवे रुग्ण; 328 मृत्यू

pradnya p

राज्यात आज ३५० नवीन कोरोना रुग्ण

prashant_c
error: Content is protected !!