तरुण भारत

”सन्माननीय पंतप्रधान मोदीजी, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?”


पुणे \ ऑनलाईन टीम

नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागले दरम्यान, निवडणुकांच्या निकालानंतर सातत्यानं पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होताना दिसत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. ” सन्माननीय पंतप्रधान मोदीजी, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोलडिझेलवर का काढताय?,” असा सवाल रुपाली चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.

रुपाली चाकणकर ट्वीट करत म्हणाल्या की, “दर महिन्याला भारतात निवडणुका असत्या तर किती बरं झालं असतं. काही नाही तर निदान पेट्रोल डिझेलचे भाव तरी स्थिर राहिले असते. पाच राज्यांच्या निवडणुक निकालापासून आजची सलग चौथ्या दिवशी भाववाढ. सन्माननीय पंतप्रधान मोदीजी, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?.”

देशात आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळालं. शुक्रवारी मुंबईमध्ये पेट्रोलचे दर २७ पैशांनी वाढून ९७.६१ रुपयांवर पोहोचले. तर डिझेलच्या दरात ३३ पैशांची वाढ झाली. मुंबईत डिझेलचे दर ८८.८२ रूपयांवर पोहोचले. तर दुसरीकडे दिल्लीमध्येही पेट्रोलचे दर २८ पैशांनी वाढून ९१.२७ रुपयांवर पोहोचले.

Advertisements

Related Stories

महागाईचा आगडोंब तीव्र

Patil_p

शिवसेना नाही ‘सोनिया सेना’ : कंगना

pradnya p

जिल्ह्यात रुग्णांचा आकडा थांबता थांबेना ; सायंकाळपर्यंत ५२ पॉझिटिव्ह

triratna

तुळशी विवाह प्रारंभ झाल्याने बाजारात पेठेत खरेदीला गर्दी

Patil_p

राज्यपाल कोट्यातून प्रविण काकडे यांना विधान परिषदेवर घ्या

triratna

वसुबारसने दिवाळी सणास प्रारंभ

Patil_p
error: Content is protected !!