तरुण भारत

कर्नाटकात सीटी स्कॅन, एक्स-रे किंमती कमी करण्याचा निर्णय

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अलिकडच्या दिवसांत वाढत असल्याने कर्नाटक सरकारने शुक्रवारी राज्यातील खासगी रुग्णालयांमध्ये सीटी-स्कॅन आणि डिजिटल एक्स-रेचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला.

मंत्री सुधाकर म्हणाले, “काही रुग्णालये आणि प्रयोगशाळेतील लोक जास्त दर आकारून लोकांचे शोषण करीत असल्याच्या तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या आहेत. ” आत सरकारने घेतलेल्या निर्णयाकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणारे आणि जास्त दर आकारणार्‍या रुग्णालये आणि लॅबवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मंत्र्यांनी दिला. सरकारी रुग्णालये सीटी-स्कॅन व एक्स-रे सुविधा विनाशुल्क उपलब्ध करुन देत आहेत, असे त्यांनी सांगितले आणि लोकांना त्यांच्या सेवांचा उपयोग करण्याचे आवाहन केले.

कोविड -१९ चे संसर्ग शोधण्यासाठी सीटी-स्कॅन किंवा एक्स-रेची आवश्यकता वाढत असल्याने खासगी रुग्णालये आणि प्रयोगशाळांमध्ये सीटी-स्कॅन आणि डिजिटल एक्स-रेची किंमत अनुक्रमे १५०० आणि २५० रुपयांवर आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के सुधाकर यांनी ट्विट केले. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, याबाबतचा अधिकृत आदेश शुक्रवार नंतर जारी होण्याची शक्यता आहे.

Advertisements

Related Stories

बेंगळूर: कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत १,२२१ शहर पोलिसांना संसर्ग, तर ११ जणांचा मृत्यू

Shankar_P

भाजपच्या कारभाराविषयी पक्षातीलच नेत्याने दाखविला आरसा : शिवकुमार

triratna

कर्नाटक पोटनिवडणूक निकाल: मस्कीत काँग्रेसचा विजय; अधिकृत घोषणा होणे बाकी

Shankar_P

मालमत्ता करवाढीचा बसणार धक्का

Patil_p

बीबीएमपी आयुक्तांकडून लसीकरणाचा आढावा

triratna

बेंगळूर: डार्क वेबवर ड्रग्ज खरेदी केल्याप्रकरणी एकाला अटक

Shankar_P
error: Content is protected !!