तरुण भारत

नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओला भीषण आग

ऑनलाईन टीम / कर्जत : 


प्रख्यात दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जतमधील स्टुडिओला भीषण आग लागली आहे. एनडी स्टुडिओमधील जोधा अकबरच्या सेटला आग लागल्याची माहिती मिळत आहे. 

Advertisements


ही आग साधारण 12 ते 12.30 च्या दरम्यान लागली. या घटनेची माहिती मिळताच कर्जत नगरपालिकेच्या अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचा प्रयत्न सुरु होते. आग इतकी भयंकर आहे की, आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट या परिसरात पाहायला मिळत आहेत. आग नक्की कशामुळे लागली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही असे सांगतिले जात असले तरी वणव्याच्या आगीमधूनच हा सेट पूर्ण जळून खाक झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार या स्टुडिओच्या मागील बाजूला असणाऱ्या जंगल परिसरामध्ये वणवा पेटला होता. नंतर ही आग स्टुडिओ परिसरामध्ये पसरली आणि तिने भीषण रुप धारण केले. जोधा अकबर या चित्रपटासाठी उभारण्यात आलेला किल्ल्याचा सेट काही प्रमाणात या आगीत जळाला आहे. एकूण नुकसान किती झाले या बाबतची कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही. 

दरम्यान, कोरोनामुळे सध्या एनडी स्टुडिओमध्ये चित्रीकरण बंद ठेवले आहे. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Related Stories

धनगर बांधवांना स्वतःच्या सरपंच मानधनातून दिला तंबू भेट

triratna

तरूण भारत इफेक्ट : वारणेच्या जिल्हा सिमेवरील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी परवाना प्राप्त

Shankar_P

छत्रपती शाहु महाराजांच्या समाधीचे काम खूपच सुंदर

Patil_p

शहरात कोरोना तपासणीचा वेग वाढला

Patil_p

सांगली : वाङ्मय प्रकल्प समितीवर प्रा. अविनाश सप्रे यांची निवड

Shankar_P

ई-पासची अट रद्द; ठाकरे सरकारकडून अनलॉक 4 ची नियमावली जाहीर

pradnya p
error: Content is protected !!