तरुण भारत

कर्नाटकला रेमडेसिवीरचा पुरवठा वाढविला

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकला १० मे ते १६ मे या कालावधीत रेमडेसिवीरचा पुरवठा २,६२,३४६ इतका होणार आहे, असे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी शुक्रवारी ट्विट करून सांगितले सांगितले.

दरम्यान मंत्री सुधाकर यांनी एका ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी कोविड -१९ विरुद्ध राज्यातील लढाई मजबूत करण्यासाठी सतत समर्थन दिल्याबद्दल आभार मानले.

राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे मात्र राज्य संकटात होते. मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीरची मागणी वाढली आहे. नुकत्याच झालेल्या पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याबाबत लक्ष केंद्रित केले.

दरम्यान,कर्नाटकातील बेंगळूर शहरी जिल्ह्यात सक्रिय सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. गुरुवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात २३,७०६ जणांना कोरोनाची लागण हाळी आहे. तर राज्यात गुरुवारी एकूण ४९,०५८ रुग्णांची भर पडली असून राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या पाच लाखाच्यावर गेली आहे.

Advertisements

Related Stories

मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी अपेक्स बँकेकडून 5 कोटींची मदत

Amit Kulkarni

काँग्रेसकडून जारकिहोळी यांना अटक करण्याची मागणी

triratna

सीडी प्रकरणातील ‘त्या’ युवतीचे न्यायाधीशांना पत्र

Amit Kulkarni

बेंगळूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Shankar_P

कर्नाटक: माजी आयपीएस अधिकाऱ्याचा भाजपमध्ये प्रवेश

triratna

शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार इस्पितळात दाखल

Patil_p
error: Content is protected !!