तरुण भारत

लसीकरण करण्याआधीच दुसऱ्या देशांना लस पाठवली ; केंद्र सरकारच्या निर्णयावर अजित पवार संतापले

पुणे \ ऑनलाईन टीम

पुण्यातील कोरोना आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कोरोना लसींच्या तुटवड्याबाबत विचारण्यात आलं असता अजित पवार यांनी केंद्रावर निशाणा साधला. आपलं लसीकरण करण्याआधीच दुसऱ्या देशांना लस पाठवली हा चुकीचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला, असा संताप यावेळी त्यांनी व्यक्त केला.

माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, देशात कोरोना विरोधी दोन लसींची निर्मिती होत आहे. एक सीरम आणि दुसरी भारत बायोटेककडून लस निर्मिती केली जातेय. पण देशातील जनतेलाच लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीय. हे अत्यंत चुकीचं आहे. रशियानंही त्यांच्याकडील जनतेला लसीकरण झाल्यानंतर स्पुटनिक-व्ही लसीची निर्यात सुरू केली. आपल्याकडील जनतेचं लसीकरण अद्याप झालेलं नसतानाही मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात आहे. केंद्राचा लस निर्यातीचा निर्णय चुकला. याचा मोठा फटका जनतेला बसत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

१८ ते ४४ वयोगटातील लोकांना लस देण्याचं सरकारच्या वतीने ठरलं होतं. पुरवठा कमी असल्याने अडचण निर्माण होत आहे. लस देणाऱ्यांना आणि नागरिकांनाही त्रास होत आहे. कोव्हॅक्सीनचा दर ४०० रुपये तर कोव्हिशील्डचा जर ३०० रुपये राज्यांसाठी ठरविण्यात आला आहे. पण केंद्राला हाच जर १८० रुपये इतका आहे. यात खूप तफावत आहे. त्यामुळे केंद्राप्रमाणेच राज्य सरकारलाही कमी दरात लस मिळायला हवी. मी येथे आल्यावर अदर पूनावाला यांना फोन लावला. अजून १० ते १२ दिवस ते परदेशात असतील असं सांगण्यात आलं आहे. तेथील क्रमांक मिळवू संपर्क सागंण्याचा प्रयत्न असेल, असं अजित पवार यांनी सांगितलं. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण होणं फार गरजेचं झालं आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं परदेशी लसींची आयात करण्याला परवानगी द्यायला हवी. जेणेकरुन जास्तीत जास्त लस उपलब्ध होतील, असं अजित पवार म्हणाले.

Related Stories

कोरोनाचा रिपोर्ट आता अवघ्या पाच मिनिटांत

prashant_c

दोन मिनिट मौन पाळत योगी आदित्यनाथ यांनी वडिलांना वाहिली श्रद्धांजली

prashant_c

बीडच्या दाम्पत्याची अमेरिकेत चाकूने भोसकून हत्या

datta jadhav

कोरोना रोखण्यासाठी नरंदे ग्रामपंचायततिची जनचळवळ

Shankar_P

सातारा : जिल्ह्यात १३५ पॉझिटिव्ह, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

triratna

दिलासादायक : कोरोनामुक्तांची संख्या ८०० च्या पार

triratna
error: Content is protected !!