तरुण भारत

कर्नाटक हायकोर्टाचा आदेश कायम!; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारची याचिका फेटाळली

बेंगळूर/प्रतिनिधी

सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारची याचिका फेटाळत कर्नाटक हायकोर्टाचा आदेश कायम ठेवला आहे. कर्नाटक हायकोर्टानं केंद्रसरकारला ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्याचा निर्णय दिला होता. दरम्यान, ५ मे रोजी दिलेल्या कर्नाटक हाय कोर्टाच्या आदेशाला आव्हान देत केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या आदेशात ऑक्सिजन पुरवठ्याबाबत सांगण्यात आलं होतं. कर्नाटक राज्याला प्रतिदिन १२०० मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा करण्याचा आदेश देण्यात आला होता. या आदेशानंतर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारची याचिका फेटाळत कर्नाटक हायकोर्टाचा आदेश कायम ठेवला आहे.

केंद्र सरकारने कर्नाटक राज्याला ऑक्सिजन पुरवठा १२०० मेट्रीक टन प्रतिदिन केला पाहीजे, असा आदेश कर्नाटक हायकोर्टाने दिला होता. सध्या कर्नाटकमध्ये ९६५ मेट्रीक टन इतका ऑक्सिजन पुरवठा होत आहे.

“आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका,” सुप्रीम कोर्टानं मोदी सरकारला फटकारलं

आज सकाळी कर्नाटक प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु होती. यावेळी सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारची याचिका फेटाळत कर्नाटक हायकोर्टाचा आदेश कायम ठेवला आहे. तसेच दुसऱ्या सुनावणीत दिल्ली सरकारचे वकील राहुल मेहरा यांनी दिल्लीचा मुद्दा उचलला. त्यांनी रात्री उशिरापर्यंत दिल्लीत ५२७ मेट्रीक टन ऑक्सिजन मिळाला आणि सकाळी ८ वाजता ८९ मेट्रीक टन ऑक्सिजन मिळाला. अजून १६ मेट्रीक टन ऑक्सिजन मिळणं बाकी असल्याचं सांगितलं. देशात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून अपुऱ्या वैद्यकीय उपकरणांचा फटकाही बसत आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागत आहे.

Advertisements

Related Stories

केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांच्या पत्नीसह अन्य 6 जणांना कोरोनाची बाधा

pradnya p

”यूपीए अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडेच राहील”

triratna

प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन जनरेटर स्थापण्याचा विचार

Amit Kulkarni

ओडिशा : बारावीची परीक्षा रद्द; मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची माहिती

pradnya p

अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या दीड लाखांवर

datta jadhav

अधिकाऱ्याची हत्या करून BSF जवानाची आत्महत्या

datta jadhav
error: Content is protected !!