तरुण भारत

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा मृत्यू…खरं काय?

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची बातमी नुकतीच प्रसारमाध्यमांनी दिली आहे. मात्र एएनआय या वृत्तसंस्थेने छोटा राजन हा जिवंत असल्याचे म्हटले आहे.मिळालेल्या माहितीनुसार नवी दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सर्व्हिसेस म्हणजेच एम्समध्ये उपचारादरम्यान राजनवर उपचार सुरु आहेत. त्याचा मृत्यू झाला ही अफवा आहे, असे एम्समधील डॉक्टरांनी म्हटले आहे.

Advertisements

तिहारच्या तुरुंगामध्येच राजनला एप्रिलच्या शेवटच्या आठवड्या कोरोनाची लागण झाली. त्याच्यावर सुरुवातीला तुरुंगातील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्याची प्रकृती स्थिर असं आधी तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र लक्षणं दिसल्यानंतर छोटा राजनची कोरोना चाचणी करण्यात आली आणि तो पॉझिटिव्ह आढळून आला. यासंदर्भातील माहिती तुरुंग प्रशासनाकडून देण्यात आली होती. राजन पॉझिटिव्ह आल्यानंतर तिथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना होम क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान राजनची प्रकृती खालावल्याने त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. २६ एप्रिलपासून राजनवर एम्समध्ये उपचार सुरु आहेत.

Related Stories

कोरोना : महाराष्ट्रात आतापर्यंत 95 हजार गुन्हे दाखल : अनिल देशमुख

pradnya p

बीपीएफचा भाजप आघाडीला रामराम

Patil_p

उत्तराखंडात रविवारी 243 नवे कोरोना रुग्ण; 2 मृत्यू

pradnya p

दिल्लीत 2,463 नवे कोरोना रुग्ण; 50 मृत्यू

pradnya p

आशा वर्कर्सच्या मानधनात 2 हजार रुपयांची वाढ; अमित ठाकरे व अजित पवार भेट यशस्वी

pradnya p

मजुरांच्या घरवापसीसाठी राज्यांनी तोडगा काढावा

Patil_p
error: Content is protected !!