तरुण भारत

कोडोलीत रविवारपासून पाच दिवसाचा जनता कर्फ्यू

वारणानगर / प्रतिनिधी

कोडोली ता.पन्हाळा येथील ग्रामपंचायतीच्या कोरोना विषाणू मुक्ती समितीच्या वतीने गावातील कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखणेसाठी रविवार दि.९ सकाळी ७.०० वाजले पासून गुरुवार दि .१३ मे च्या रात्री १२ वा. पर्यत ग्रामस्तर कोरोना समितीने “ जनता ककर्फ्यू ” पुकारला असल्याची माहिती समितीच्या अध्यक्षा सरपंच मनिषा पाटील यानी दिली.

कोडोलीतील सर्व ग्रामस्थ व व्यापारी यांना याबाबत परिपत्रक काढून कळवणेत आले असून बंद कालावधीत अत्यावश्यक मध्ये दवाखाने २४ तास चालू राहतील,मेडीकल, कृषी बी – बियाणे दुकाने सकाळी ७ ते १२ व सायं .४.३० ते ८ पर्यंत चालु राहतील,दुध संकलन व विक्री संस्था सकाळी ७ ते सकाळी ९ व सायं .६.५० ते ८.३० वाजेपर्यंत चालू राहतील, फरशी – वाळू दुकाने, बिअर बार, नाष्टा सेंटर,चायनीज सेंटर,वाईन शॉप,देशी दारू दुकाने, हॉटेल, भाजीपाला विक्री, मटन विक्री, इतर सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहतील,स्थानिक सहकारी संस्था,पत संस्था पूर्णपणे बंद राहतील, सरकारी बँका व विमा संस्था यांचे फक्त कार्यालयीन कामकाज सुरु राहील. याव्यतिरिक्त कोणतीही आस्थापना चालू राहिलेस त्यांचेवर कडक कारवाई करून पुढील आदेश होऊ पर्यत दुकान सीलबंद केले जाईल याची सर्वानी नोंद घ्यावी असे कळवले आहे.

जनता कर्फ्यू आदेशांचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता १८६० (४५) कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे गुन्हा नोंद करुन दंडात्मक कारवाई करणेत येईल वरील या सुचनांचे पालन करुन कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखणेसाठी समितीस सहकार्य करावे असे आवाहनही सरपंच मनिषा पाटील यानी केले आहे.

Related Stories

पोस्टल कॉलनी पाचगाव येथे आढळले तीन पॉझिटिव्ह रुग्ण

Shankar_P

कोल्हापूर : निवडणूक निकालानंतर पोखलेत दोन गटात हाणामारी, ३३ जणांना अटक

triratna

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात कोरोनाने शतक पूर्ण ; एकुण रुग्णसंख्या ११० तर ३५ जणांची कोरोनावर मात

triratna

गस्त वाढवण्याबाबत पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा करणार : नूतन कारागृह अधीक्षक इंदुरकर

triratna

पाचगाव परिसरातील सुमारे 90 माकडांना सोडले राधानगरी अभयारण्यात

triratna

हवामानाचा अंदाज सात बाय सहाच्या खोलीतून

triratna
error: Content is protected !!