तरुण भारत

टाटा मोर्ट्सच्या प्रवासीवाहनांच्या किमती महागणार

नवी दिल्ली

टाटा मोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार आज आठ मेपासून आपल्या प्रवासी वाहनांच्या किमती महागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विविध मॉडेल्सच्या प्रवासी वाहनांच्या किमतीत वाढ केली जाणार आहे. सदरच्या वाहनांच्या किमती वाढविण्याचे स्पष्टीकरण देताना कंपनीने म्हटले आहे,की कच्च्या मालाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे ही दरवाढ करण्यात येत आहे. यामध्ये ज्या ग्राहकांनी सात मे किंवा त्याअगोदर वाहन बुकिंग केलेले आहे त्यांना मात्र वाढीव किमतीपासून दिलासा मिळणार असल्याची माहिती आहे. टाटा मोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार आठ मेपासून कंपनी आपल्या प्रवासी वाहनांच्या किमतीत साधारणपणे 1.8 टक्क्यांची वाढ करणार आहे.

Advertisements

Related Stories

नफा वसुलीच्या प्रभावाने बाजारात घसरण

Patil_p

शेअर बाजारात घसरण कायम

Patil_p

टीसीएस कंपनीचा बायबॅक झाला खुला

Patil_p

देवयानी इंटरनॅशनलचा समभाग 13 टक्के वधारला

Amit Kulkarni

लावा कंपनी आणणार आयपीओ

Amit Kulkarni

टाटा स्टील भक्कम नफ्यात

Patil_p
error: Content is protected !!