तरुण भारत

कोरोना काळात नागरिकांना त्रास दिला, महिला पोलिसासह चौघे निलंबित

सोलापूर / प्रतिनिधी

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी नाकाबंदीच्या ठिकाणी नागरिकांना त्रास देऊ नका, अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतरही नागरिकांना त्रास देणार्‍या महिला पोलिसासह चार पोलिसांना पोलीस अधीक्षक सातपुते यांनी निलंबित केले आहे. पोलीस हवालदार रमेश सुरणार, पोलीस कर्मचारी निखिल पवार, प्रविण सिंपले व महिला पोलिस कर्मचारी प्रियंका आखाडे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.

सध्या कोरोना महामारीने अनेकांचे हाल होत आहेत. अनेकांचे रोजगार गेले. यामुळे लोक आर्थिक अडचणीत आहेत. या काळात लोकांना पोलिसांकडून त्रास होऊ नये, याकरीता पोलीस अधीक्षक सातपुते यांनी जिल्ह्तील सर्व पोलीस ठाणे आणि इतर विभागातील पोलिसांना नागरिकांना त्रास  न देण्याच्या सक्त सूचना केल्या होत्या. त्यानंतरहि टेंभुर्णी पाfरसरात नाकाबंदीच्या ठिकाणी नागाfरकांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी अधीक्षत सातपुते यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचार्‍यांबाबत माहिती घेण्यात आली. त्यामध्ये सत्यता आढळून आली. हि बाब अंत्यंत गंभीर असल्याचे नमूद करुन सातपुते यांनी त्या चार कर्मचार्‍यांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत असे सांगितले. दरम्यान, कोरोना काळातील बंदोबस्ताकरीता पोलीस मुख्यालय, पोलीस ठाणे तसेच वाहतूक शाखेकडील कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

Related Stories

मुख्यमंत्र्यांनी गतवर्षी दिलेल्या आश्वासनाचे सोनं करावे : फडणवीस

Shankar_P

सोलापूर : चिखलठाण येथील अजित गलांडे खून प्रकरण

triratna

सोलापूर : करमाळा शहरातील व्यापारी, कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक

triratna

पृथ्वी संकटात , कमी उर्जा वापराच्या जीवनशैलीकडे चला !

prashant_c

सोलापूर शहरात १८९ रुग्ण कोरोनामुक्त तर ४३ पॉझिटीव्ह

Shankar_P

सोलापूर जिल्ह्यातील या 212 गावात नाही कोरोनाचा शिरकाव

Shankar_P
error: Content is protected !!