तरुण भारत

गोवा लोकायुक्तपदी अंबादास जोशी शपथबद्ध

प्रतिनिधी / पणजी

गोव्याचे नवे लोकायुक्त म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश  अंबादास हरीभाऊ जोशी यांनी काल शुक्रवारी येथील राजभवनवर शपथग्रहण केले. दोनापावला येथील राजभवनात हा कार्यक्रम झाला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवन मुंबई येथून जोशी यांना ऑनलाईन पद्धतीने शपथ दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्यावेळी हजर होते.

Advertisements

 राज्यपालांचे सचिव आर. मिहीर वर्धन यांनी लोकायुक्तांच्या नेमणुकीच्या आदेशाचे वाचन केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मुख्य सचिव परिमल राय आयएएस, लोकायुक्त सचिव पी. एस. रेड्डी आयएएस आणि दक्षता खात्याचे सचिव चैतन्य प्रसाद, आयएएस यावेळी उपस्थित होते, असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.

 लोकायुक्त हे पद गेले सात ते आठ महिने रिक्त होते, आणि ते भरण्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू होते. दरम्यान लोकायुक्त संस्था अधिकारीणी शक्तीहिन बनवल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे.

Related Stories

कळंगूटमध्ये सुरक्षा रक्षकावर हल्ला

Amit Kulkarni

फोंडा नगराध्यक्षपदी अपूर्व दळवी निश्चित

Patil_p

वास्कोत दिवसाढवळय़ा फ्लॅट फोडून दोन लाखांचा ऐवज लंपास

Patil_p

व्यापार परवाना शुल्कावर बैठकीत अंतिम निर्णय झालेला नाही

Patil_p

राज्यातील 14 हजार हेक्टर पडीक जमीन लागवडीखाली येणार

tarunbharat

फोंडय़ात 20 पासून द्राक्ष महोत्सव

Amit Kulkarni
error: Content is protected !!