तरुण भारत

”नागरिकांचा जीव जात असताना पंतप्रधान मात्र टॅक्स वसूलीत मग्न”

ऑनलाईन टीम / मुंबई

कोरोनाचा देशात कहर सुरुच असुन काही राज्य संपुर्ण लॉकडाऊन करत आहेत, तर कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये गेल्या सहा दिवसात तब्बल 20 टक्के रुग्णसंख्या वाढली आहे. याच्यामुळे ही राज्ये देशातील कोरोनाचे नवे हॉटस्पॉट बनत असल्याचं आकडेवारीतुन समोर येत आहे. तसेच रोजच कोरोना रुग्णांची नकोशी विक्रमी नोंद होत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यामुळे करोना रुग्णांची साखळी तोडण्याचं मोठं आवाहन प्रशासनासमोर आहे. यातचं भर म्हणुन गेले काही दिवस देशातील लसीकरणाचा वेग मंदावला असुन काही ठीकाणी लसीकरण हे काही दिवस थांबवत- थांबवत दिलं जात आहे. याच्यामुळे अनेक राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना लसींचा पुरवठा वाढवत संख्या ही अधिक देण्याची मागणी करत आहेत.त्या पार्श्वभूमीवर आता राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

त्यात कोरोना व्हॅक्सिनच्या किंमतीनंतर आणि त्यावरील वसूल करण्यात येणाऱ्या कराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. शुक्रवारी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र लिहून व्हॅक्सिन खरेदीवरील जीएसटी टॅक्स माफ करण्याची विनंती केली होती.

नागरिकांचा जीव जात असताना पंतप्रधान कर वसूल करण्यात मग्न असल्याची बोचरी टीका त्यांनी ट्वीटमधून केली आहे. ‘जनता के प्राण जाए पर PM की टॅक्स वसूली ना जाए’, असं ट्वीट त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर हॅशटॅग जीएसटीचाही वापर केला आहे.असं म्हटलं आहे.

Advertisements

Related Stories

देशात नव्या बाधितांमध्ये वाढ

Patil_p

सकाळी करताय गर्दी कसा हरणार कोरोना?

Omkar B

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

Rohan_P

दिवाळी संपताच नगरपंचायत निवडणूक जाहीर

Patil_p

मंत्र्याचे बेताल वक्तव्य : वृध्द दगावले तरी चालेल; मुलांना मिळाली पाहिजे होती लस

Rohan_P

गोग्रा, डेपसांगमधील सैन्यवापसीवर भारत-चीनमध्ये चर्चा

datta jadhav
error: Content is protected !!