तरुण भारत

युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतचाही कोव्हिडविरुद्ध लढय़ात पुढाकार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत याने देखील कोव्हिडविरुद्ध लढय़ात पुढाकार घेतला. बेडसह ऑक्सिजन सिलिंडर व बाधित रुग्णांसाठी आवश्यक किट यासाठी आपण काही रक्कम सुपूर्द करत असल्याचे त्याने शनिवारी जाहीर केले. मात्र, याचा तपशील त्याने उघड केला नाही.

Advertisements

23 वर्षीय रिषभने आपण गुरुग्रामस्थित हेमकंत फाऊंडेशन या एनजीओला सदर रक्कम सुपूर्द करत असल्याचे आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन जाहीर केले. मागील वर्षभरापासून कोव्हिडविरुद्ध अविरतपणे लढत असलेल्या देशातील कोरोना योद्धय़ांनाही त्याने याप्रसंगी सलाम केला. ‘एकत्र लढत यश खेचून आणण्यावर भर असायला हवा, हा सर्वात मोठा धडा मी माझ्या खेळातून शिकलो’, असे पंतने आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले. सध्या प्रथम पसंतीचा यष्टीरक्षक-फलंदाज असलेल्या रिषभ पंतने अलीकडेच निलंबित केल्या गेलेल्या आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व सांभाळले आहे.

देशभरात कोरोनाच्या अस्मानी संकटामुळे सध्याही जवळपास रोज 3 हजार नागरिकांचा बळी जात आहे. कोरोनाच्या या दुसऱया लाटेमुळे जगणेही बेहाल झाले आहे. याचा उल्लेख करत पंतने देशातील सर्व नागरिकांना कोव्हिडविरुद्ध या लढय़ात सहभागी होण्याचे आवाहन केले.

 ‘देशात सर्वच ठिकाणी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विद्यमाने लसीकरणाची मोहीम मोठय़ा प्रमाणात राबवली जात आहे. प्रत्येक नागरिकाने यात सहभागी होऊन लसीकरण करवून घ्यावे व सर्व कोरोनाप्रतिबंधक पथ्ये पाळावीत, जेणेकरुन हा लढा आपण लवकरात लवकर जिंकू शकू’, असे तो पुढे म्हणाला. विराट कोहली, शिखर धवन, जयदेव उनादकट, हार्दिक पंडय़ा आदी अन्य काही खेळाडूंनी देखील कोव्हिडविरुद्ध या लढय़ात यापूर्वीच प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. शिवाय, यासाठी जनजागृतीवर देखील भर दिला आहे.

Related Stories

आय लीगचा प्रारंभ 9 जानेवारीपासून

Patil_p

मर्यादित षटकांच्या मालिकेतून वॉर्नर बाहेर

Patil_p

एएफसीच्या कोरोना मोहिमेत बाला देवीचा समावेश

Patil_p

त्सित्सिपसला हरवून स्पेनचा कार्लोस चौथ्या फेरीत

Patil_p

चेन्नईचा केकेआरविरुद्ध सनसनाटी विजय

Patil_p

ऑस्ट्रियाचा थिएम पहिल्याच फेरीत पराभूत

Patil_p
error: Content is protected !!