तरुण भारत

‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमाला हरताळ!

शनिवारी बाजारपेठेत प्रचंड गर्दी

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

गर्दी टाळण्यासाठी सरकारने सोमवारपासून लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे बेळगावकरांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी करून या नियमालाच चक्क हरताळ फासला. शनिवारी सकाळी अर्धे शहर रस्त्यावर उतरले होते आणि जेथे बघावे तेथे गर्दीच गर्दी दिसून आली. आश्चर्य म्हणजे गर्दीचा भाग असणारेच एवढी गर्दी करण्याची गरजच काय? असा प्रश्न करत होते.

लॉकडाऊन काळात सरकारने खरेदीसाठी काही अवधी दिला आहे. दूध, भाजी आणि औषधे यांची टंचाई भासू नये म्हणून याची काळजीही घेतली आहे. परंतु शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासून शहरातील बहुसंख्य भागामध्ये व प्रामुख्याने बाजारपेठांमध्ये गर्दीने उच्चांक गाठला. तरुण भारत टीमने शनिवारी सकाळी शहराचा फेरफटका मारला असता मॉलसमोर खरेदीसाठी लांबच लांब रांगा दिसून आल्या. लहान दुकानांसमोर, रेशन दुकानांसमोर आणि मद्यविक्रीच्या दुकानांसमोर रांगाच रांगा पाहायला मिळाल्या. कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून सरकारने, स्थानिक प्रशासनाने औषध दुकाने सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. तरीसुद्धा औषधांच्या दुकानांमध्ये झालेली गर्दी बुचकळय़ात टाकणारी ठरली.

रिलायन्स मॉलसमोर लोकांची रांग

टिळकवाडीमध्ये सकाळी 6 पासूनच रिलायन्स मॉलसमोर लोकांची रांग सुरू झाली. मॉल चालकांनी सॅनिटायझर आणि सामाजिक अंतराचा नियम कसोशीने पाळला. मात्र, सकाळी 8 वाजेपर्यंत मॉलपासून अनगोळ नाक्मयापर्यंत नागरिकांची रांग वाढतच राहिली. यातील काही ग्राहकांशी संपर्क साधता त्यांनी जीवनावश्यक वस्तू घेणे आवश्यक आहे. सोमवारी सकाळी 10 पर्यंतच खरेदी करता येणार आहे. आज किमान दोन तासांचा अवधी वाढवून मिळाला असल्याने आजच खरेदी उरकलेली बरी, असे सांगितले.

याच रांगेमध्ये मूळच्या नागालँडच्या व सध्या येथील ब्युटीपार्लरमध्ये काम करणाऱया काही युवती होत्या. त्यांच्याशी संवाद करता त्यांनी आपल्याला काही वस्तू अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे आपण खरेदीसाठी आलो आहोत, इतकेच नव्हे तर गेल्या दोन वर्षांपासून आपण आपल्या मायभूमीकडे जाऊ शकलेलो नाही व कुटुंबीयांना भेटू शकलो नाही, असे त्यांनी सांगितले.

मूळच्या बेळगावच्याच परंतु सध्या बेंगळूरमध्ये काम करत असणाऱया केतकी कस्तुरी यासुद्धा खरेदीसाठी ताटकळत उभ्या होत्या. लॉकडाऊन काळातही काही काळ मुभा देण्यात आली आहे. तरी खरेदीसाठी गर्दी कशासाठी, असे विचारता आपण सध्या ‘वर्क फ्रॉम होम’ करत असल्याने सोमवारपासून काम सुरू करावे लागेल. आज आणि उद्या सुटी आहे. याच कालावधीत खरेदी करावी लागणार आहे, असे त्या म्हणाल्या.

डी-मार्टसमोरही मोठी गर्दी

जितकी गर्दी रिलायन्स मॉलसमोर होती त्याच्या दुप्पट गर्दी डी-मार्टसमोर झाली. मात्र, डी मार्टचे कर्मचारी रांगेतील सर्वांना सामाजिक अंतर पाळण्यासाठी सातत्याने सूचना करून शिस्तीचे पालन करण्याचा आग्रह धरत होते. डी-मार्टने थेट प्रवेश न देता बेसमेंटपासून आतमध्ये जाण्याची व्यवस्था केली आणि सॅनिटायझर, सामाजिक अंतर या नियमांचे पालन करण्यावर भर दिला. नेहरुनगर येथील डी-मार्टसमोरही गर्दी झाली. मात्र, ती बऱयापैकी नियंत्रित होती. लोकांनीसुद्धा कोविड-19 च्या नियमांचे पालन करून खरेदी केली.

 रांगांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचाही भरणा

खरेदीसाठी असलेल्या रांगांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचाही भरणा होता. वास्तविक 60 वर्षांवरील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे सरकार सांगत आहे. परंतु या ज्ये÷ नागरिकांची अडचण वेगळीच आहे. बहुसंख्य कुटुंबामध्ये साठी उलटलेले पती-पत्नी आहेत. त्यांची मुले बाहेरगावी आहेत. इतर कोणी त्यांना साहित्य आणून देण्यासारखे नाहीत. त्यामुळे या नागरिकांना नाईलाजाने खरेदीसाठी घराबाहेर पडावे लागत आहे. आमच्यासाठी निदान एक स्वतंत्र रांग करावी किंवा ज्ये÷ नागरिकांना खरेदीसाठी प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टिळकवाडी परिसरात औषध, भाजी आणि अन्य वस्तू खरेदीसाठी गर्दी होती. त्याच्या कित्येक पटीने गर्दी शहापूर व बेळगाव मुख्य बाजारपेठेत झाली. शनिवार हा शहापूरच्या भाजी बाजाराचा खास दिवस. या ठिकाणी दर शनिवारी अनगोळ, टिळकवाडी आणि बेळगावमधूनसुद्धा ग्राहक खरेदीला येतात. सकाळी 7 पासूनच येथे बाजार भरतो. शनिवारी सकाळी या ठिकाणी नेहमीपेक्षा दुप्पट गर्दी दिसून आली. प्रत्येकजण शक्मयतो जादा साठा करण्याच्या हेतूनेच खरेदी करीत असल्याचे दिसून आले.

शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत म्हणजेच नरगुंदकर भावे चौक, गणपत गल्ली, मेणसी गल्ली इतकेच नव्हे तर समादेवी गल्लीतसुद्धा प्रथमच गर्दी दिसून आली. वास्तविक क्लोजडाऊन जाहीर झाल्यापासून दररोजच लोक खरेदीला येत आहेत. ते नेमकी काय खरेदी करत आहेत, हेच आता गौडबंगाल आहे. कडधान्ये, धान्य खरेदी, भाजीपाला यांची खरेदी तर दररोज सुरू आहे. आश्चर्य म्हणजे कोरोनाची धास्ती असताना एवढी गर्दी कशासाठी असा प्रश्न प्रत्येकजण दुसऱयाला करत आहेत. पण अशा सर्वांच्यामुळेच गर्दीचा ओघ वाढतो आहे, तसा कोरोनाचा   धोकाही वाढतो आहे, हेच कोण लक्षात घेणार आहे?

आंबे विपेत्यांची संख्या अमर्याद वाढली

धान्य आणि भाजीपाला याबरोबरच आंबे विपेत्यांची संख्या अमर्याद वाढली आहे. तार स्वरात ओरडून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. भर बाजारपेठेत फणस सोलून गऱयांची विक्री सुरू होती. त्यामुळे तेथेही लोकांनी गर्दी केली. इतकी गर्दी झाल्याने कोणती वस्तू विकली जात आहे, हे पाहण्यासाठी तेथे जाणाऱयांमुळे आणखी गर्दी वाढत होती.

एकूण आढावा घेता खत, बी-बियाणे, जनावरांसाठीचा चारा यांची खरेदी ही खऱया अर्थाने आवश्यक स्वरुपात गणली जाते. परंतु दैनंदिन वस्तू खरेदी करणाऱयांच्या गर्दीमुळे या महत्त्वाच्या साहित्याची खरेदी करणाऱयांना बऱयाच अडचणींचा सामना करावा लागला. शनिवार असल्याने गर्दी झाली. परंतु उद्या रविवार आणि लॉकडाऊन होण्याचा आधीचा दिवस असल्याने गर्दीचा उच्चांक करून बेळगावकर धोका वाढविण्यास हातभार तर लावत नाही ना, अशी भीती डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करत आहेत.

Related Stories

लॉकडाऊनच्या काळात 1 कोटी 10 लाखाचा मुद्देमाल जप्त

Patil_p

प्रशासनाचा निषेध करण्यासाठी शेतकऱयांचे अनोखे आंदोलन

Amit Kulkarni

अधिवेशन तयारी : पाहणीसाठी एडीजीपी बेळगावात

Amit Kulkarni

यल्लम्मा डोंगरावर भाविकांना येण्यास सक्तमनाई

Patil_p

मनपा-स्मार्ट सिटी कंपनीच्या वादात शहरवासीय अंधारात

Omkar B

बेळगाव रेल्वे स्थानकाला वीर सिंधूर लक्ष्मण यांचे नाव द्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!