तरुण भारत

रत्नागिरी : लोटेतील सुप्रिया लाईफसायन्सचे दोन कोविड सेंटर उद्यापासून सेवेत

कंपनी चेअरमन सतिश वाघ यांची माहिती, ५० लाखाचे अनुदान

प्रतिनिधी / खेड

Advertisements

कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेत कोरोनाबाधित रूग्णांना तातडीने उपचार मिळावेत, याकरिता लोटे औद्योगिक वसाहतीत सुप्रिया लाईफ सायन्स कंपनीचे दोन अद्ययावत कोविड सेंटर १० मे पासून कार्यान्वित होणार असल्याची माहिती कंपनीचे चेअरमन सतिश वाघ यांनी दिली. या दोन कोविड सेंटरसाठी ५० लाखाचे अनुदान दिले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून लोटे औद्योगिक वसाहतीतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सर्वच पातळ्यांवर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. प्रशासनाच्या दिमतीला अनेक स्वयंसेवी संस्थाही मदतीचा हात देत आहेत. यापार्श्वभूमीवर सुप्रिया लाईफ सायन्स कंपनीनेही प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी धाडसी पाऊल टाकले आहे.

लोटे येथील एस.एम.एस.च्या हॉटेल वक्रतुंड येथे व्हेंटिलेटरसह सुसज्ज तीन आयसीयु बेड व परशुराम हॉस्पिटल येथे ऑक्सिजन पुरवठा असलेल्या ३० बेड्सचे कोविड सेंटर सोमवारपासून जनतेच्या सेवेसाठी खुले होणार आहे. सुप्रिया लाईफसायन्स कंपनीच्या सीएसआर अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या कोविड सेंटरसाठी कंपनीने ५० लाखाचे अनुदान दिले आहे.

यापाठोपाठच डाऊ केमिकलचे व्यवस्थापक मुकादम यांनी पशुराम हॉस्पिटलला ७ लाख रूपयांचे मॉनिटर्स, श्रेयस कंपनीचे मालक दिनेश शर्मा यांनी कोविड सेंटरसाठी डॉ. गौंड यांना ५ लाख, गौतम मकरिया पुष्कर उद्योगांनीही ५ लाखाची मदत दिली आहे. लोटे औद्योगिक वसाहतीत सुरू होणाऱ्या या दोन कोविड सेंटरमुळे परिसरातील कोरोनाबाधित रूग्णांना दिलासा मिळाला असून हे कोविड सेंटर रुग्णांसाठी वरदानच ठरणार आहेत.

सुप्रिया कंपनीचे चेअरमन सतिश वाघ यांनी यापूर्वीही कोरोनाच्या संकटात जिल्हा पोलीस दलाला मोलाची मदत करताना पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी मुबलक प्रमाणात औषध साठा उपलब्ध करून दिला होता. यापाठोपाठच कोविड सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याने त्यांच्या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

Related Stories

रत्नागिरी : सोवेलीत दोन चिमुकल्यांसह महिलेने केली आत्महत्या

Abhijeet Shinde

पत्रादेवी लाठी बंद करण्याचा निर्णय दुर्दैवी

NIKHIL_N

दांडी किनारी आणखी एक एलईडी बल्ब आढळला

NIKHIL_N

जिल्हा रुग्णालयातील वॉर्डबॉयला ‘कोरोना’

NIKHIL_N

रत्नागिरी जिल्ह्यात नवे १०६ पॉझिटिव्ह तर ४२ रुग्ण कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

माडबन समुद्र किनारी आढळली ऑलिव्ह रिडले कासवाची 88 अंडी

Patil_p
error: Content is protected !!