तरुण भारत

झोपेतून जागे व्हा आणि कोरोना समस्यांचा सामना करा – केंद्राला आयएमएने सुनावलं

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

कोरोनाच्या गंभीर स्थितीमुळे दिवसेंदिवस देशात कोरोना विळखा घट्ट होतो आहे. वाढणाऱ्या रुग्णांची संख्या यामुळे आरोग्यव्यवस्थेवर पडणारा ताण तर याच स्थितीत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ऑक्सिजन सारख्या मुलभुत घटकांची भासणारी कमतरता. कोरोनामुळे मृत्यूचे सुरु असलेले तांडव थांबायला तयार नाहीत. यामुळे राष्ट्रीय पातळीवर लॉकडाऊन लागू करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. देशातील या गंभीर परिस्थितीकडे डॉक्टरांची शिखर संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने (आय एम ए) मोदी सरकार आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला सुनावलं आहे.

राज्याराज्यांत लावण्यात येणारे लॉकडाऊन परिणाम कारक नसल्याचं सांगत झोपेतून जागे व्हा, अशी संतप्त टीका आयएमएने केली आहे. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनने केद्रास राष्ट्रीय लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिला होता.परंतु याला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. आयएमने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांनी आणि सहकाऱ्यांनी केंद्र सरकारला करोनाचा प्रसार रोखण्यासाठी काही सल्ला दिला. मात्र, तो सरकारने त्याला कचराकुंडीत दाखवल्याचाआरोप संघटनेनं केला आहे.

Advertisements

Related Stories

चिनी आगळीकीमुळेच सीमेवर तणाव

Patil_p

पेट्रोलच्या दरात आज वाढ तर डिझेलच्या किंमतीत घट

Rohan_P

पंतप्रधानांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Patil_p

पूजेचे स्वरुप आम्ही ठरवू शकत नाही!

Patil_p

महाराष्ट्रात ९ हजार १७० नवे कोरोना रुग्ण

Sumit Tambekar

आसाम मुख्यमंत्रिपदाचा तिढा आज सुटणार ?

Patil_p
error: Content is protected !!