तरुण भारत

गुजरातने केलं, महाराष्ट्र केव्हा करणार ‘म्यूकोरमाइकोसिस’च्या वायल खरेदी?

ऑनलाईन टीम / अहमदाबाद : 

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये म्यूकोरमाइकोसिसचा (काळी बुरशी) धोका वाढला आहे. गुजरात सरकारने अशा रुग्णांसाठी रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड सुरू केले आहेत. तसेच म्यूकोरमाइकोसिसच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या 5000 वायल्सही खरेदी केल्या आहेत.

Advertisements

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 परिस्थितीवरील कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सरकारने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्या अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये म्यूकोरमाइकोसिसच्या 19 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशा रुग्णांच्या उपचारासाठी या हॉस्पिटलमध्ये 60 खाटांसह दोन स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत. वडोदरा, सुरत, राजकोट, भावनगर, जामनगर आणि इतर ठिकाणी सरकारी रुग्णालयांमध्येही अशाच सुविधा उभारल्या जातील. 

राज्याच्या आरोग्य विभागाने या आजाराच्या उपचारासाठी 3.12 कोटी रुपये खर्च करून ॲम्फोटेरिसिन-बी 50 एमजी इंजेक्शनच्या 5000 वायल्स खरेदी केल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकार केव्हा खरेदी करणार ‘म्यूकोरमाइकोसिस’च्या वायल ? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

Related Stories

इंधन दरात सुसाट वाढ

Patil_p

पाच राज्यातील निवडणूक लांबणार?

Patil_p

पश्चिम बंगालमध्ये गेल्या 24 तासात 1435 नवे कोरोना रुग्ण; 24 मृत्यू

Rohan_P

दीपक कोचर यांना 19 पर्यंत इडीची कोठडी

Patil_p

महाराष्ट्र : 10 वी,12वी च्या परीक्षांच्या तारखा जाहीर : शिक्षण मंत्र्यांची घोषणा

Rohan_P

डॉक्टरांसोबत गैरवर्तन आता दयायाचना

Patil_p
error: Content is protected !!