तरुण भारत

महाराष्ट्र एकीकरण समितीचे कोविड विलगिकरण केंद्र उद्यापासून बेळगावकरांच्या सेवेत

प्रतिनिधी / बेळगाव

महाराष्ट्र एकीकरण समिती कोविड विलगिकरण केंद्र सोमवार दिनांक 10 मे 2021 पासून बेळगावकरांच्या सेवेत रुजू होणार आहे.
सर्वाना कळविण्यात येत आहे की समितीच्या वतीने सुरू करण्यात येणारे केंद्र हे कोरोना विलगिकरण असून हे हॉस्पिटल नाही . त्यामुळे येथे ऑक्सिजन बेड उपलब्ध राहणार नाहीत. त्यामुळे ज्या रुग्णांची ऑक्सिजन पातळी 90 च्या खाली जात आहे त्यांनी आपल्या रुग्णांना मराठा मंदिर येथे न आणता इतर हॉस्पिटल मध्ये भरती करावे.

Advertisements


मराठा मंदिर येथील विलगिकरण केंद्रात कोण उपचार घेऊ शकतात?

*तर ज्यांचे घर लहान आहे किंवा एकत्र कुटुंब आहे आणि घरात एकटे दोघे कोरोना बाधित असतील आणि घरातील इतर मंडळींना त्याची लागण होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे त्या लोकांसाठी हे केंद्र उपयोगी आहे.
*त्याच प्रमाणे जे लक्षण विरहित कोरोना रुग्ण आहेत, ज्यांना विलगिकरन(कोरेन्टाईन) होण्यास सांगितले आहे ते या केंद्रात भरती होऊ शकतात.
*या केंद्रात भरती होताना, कोविड पोजिटिव्ह अहवाल सक्तीचा आहे.तसेच रुग्णाचे वय 70 च्या आता असले पाहिजे.
*ऑक्सिजन पातळी 90 च्या वर असली पाहिजे.
*सिटीस्कॅन HRCT स्कोर 8 च्या आत राहिला पाहिजे.


केंद्रातील सोई सुविधा

*केंद्रात रुग्णांच्या देखभालीसाठी आणि उपचार देण्यासाठी 24 तास डॉक्टर, नर्स यांचे वैद्यकीय पथक उपस्थित राहणार आहे.
*गरजू रुग्णांसाठी औषधे उपलब्ध असतील.
*रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था केंद्रामध्ये केली जाणार आहे.
*आपत्कालीन परिस्थिती मध्ये राखीव ऑक्सिजन आणि रुग्णवाहिकेची सोय राहणार आहे.
तरी वरील नियमांचे पालन करून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विलगिकरण केंद्रात रुग्णांना भरती करण्यासाठीच संपर्क साधावा. 08312428907

Related Stories

कागवाड येथे अंगणवाडी सेविका, ग्रा. पं. कर्मचाऱयांचे आंदोलन

Patil_p

कोरोना महामारीमुळे बुरुड समाज सापडला आर्थिक संकटात

Amit Kulkarni

रस्त्यावरील खडीमुळे अपघाताचा धोका

Amit Kulkarni

कोनेवाडीत चार गवतगंज्यांना आग

Patil_p

मांड्या खासदार सुमलथा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

बागलकोट जिल्हय़ात तिघांना कोरोनाची लागण

Patil_p
error: Content is protected !!