तरुण भारत

पिसुर्ले पंचायत क्षेत्रामध्ये संचारबंदीला सुरुवात

वाळपई/प्रतिनिधी

सत्तरी तालुक्मयातील पिसुर्ले पंचायत क्षेत्रातीमध्ये पंचायत मंडळाने हाती घेतलेला संचारबंदीला चांगला प्रतिसाद लाभत आहे. गेल्या दोन दिवसापासून पंचायत क्षेत्रातील सर्व प्रकारचे आस्थापने बंद आहेत. नागरिकांच्या सहकार्याबद्दल सरपंच जयश्री देवानंद परब यांनी सर्वांचे आभार व्यक्त केलेले आहे .

Advertisements

 येणाऱया काळातही संचारबंदीच्या काळात नागरिकांनी व दुकानदारानी चांगल्या प्रकारचे सहकार्य द्यावे असे आवाहन सरपंच परब यांनी व्यक्त केले आहे.

या भागांमध्ये काही प्रमाणात रुगणांची संख्या हळूहळू वाढू लागलेली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून पंचायत मंडळाने एक महत्त्वाची बैठक घेऊन सात दिवसाची संचारबंदी लागू करण्यासंदर्भात निर्णय घेतला. त्यासंदर्भाची अंमलबजावणी दोन दिवसापासून झालेली आहे . त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभत असल्याचा दावा सरपंच जयश्री परब यांनी व्यक्त केलेला आहे .यासाठी सर्व पंच मंडळांने चांगल्या प्रकारचे सहकार्य लाभत आहे .नागरिकांना या संदर्भात  आवाहन करण्यात येत असल्याने चांगल्या प्रकारचा प्रतिसाद सर्वातकडून मिळत असल्याचा दावा सरपंच सौ परब यांनी व्यक्त केलेला आहे.

सध्यातरी पंचायत क्षेत्रातील अत्यावश्यक सामानाची विक्री करणारी काही दुकाने सोडल्यास इतर सर्व प्रकारची दुकाने बंद आहेत. त्याचप्रमाणे पिसुर्ले पंचायत शेत्रातील मध्यवर्ती भागामध्ये मोठय़ा प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. यामुळे संचारबंदी लागू केल्याने ही वर्दळ बऱयाच प्रमाणात कमी झालेली आहे.  सरकारतर्फे रविवारपासून संचारबंदी लागू केलेली आहे. पंचायतीने 7दिवसाची संचारबंदी लागू केलेली आहे. यामुळे सरकारच्या पंधरा दिवसाच्या संचारबंदीला विचार केला तर य पंचायत क्षेत्रात पंधरा दिवसांनी संचारबंदी लागू होणार असल्याचे सरपंच स्पष्ट केलेले आहे त्याचप्रमाणे येणाऱया काळातही नागरिकांनी सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वा?ची अंमलबजावणी करावी व त्याचे उल्लंघन होणार नाही याची विशेष दखल घ्यावी असे आवाहन पंचायत मंडळाच्या वतीने सरपंच सौ परब यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याची गोव्याची क्षमता

Patil_p

राज्यात येणाऱया पर्यटकांना कोविडच्या दोन्ही चाचण्या सक्तीच्या

Amit Kulkarni

मडगावः वडिलांना सोडण्यास कोर्टाचा नकार

Omkar B

मोन्सेरात यांचा शुभ दीपावलीचा बॅनर्स फाडला

Amit Kulkarni

फातोर्डा फॉरवर्डचे 13 ही उमेदवार विजयी होणार

Amit Kulkarni

राज्यात 11 ते 14 एप्रिलपर्यंत कोरोना लसीकरण उत्सव

Amit Kulkarni
error: Content is protected !!