तरुण भारत

म्हापशात संचारबंदीची कडक अंमलबजावणी

आमदार जोशुआ डिसोझा यांनी घेतला आढावा विनाकारण फिरण्याऱयांवर कडक कारवाई : पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांचा इशारा

प्रतिनिधी / म्हापसा

Advertisements

म्हापशात सर्वत्र कडक बंदोबस्तात संचारबंदीला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी दुपारी पालीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शर्नाखाली पोलीस अधिकाऱयांनी  म्हापसा शहरात येणाऱया गाडय़ांची गांधी चौक परिसरात कडक तपासणी केली जात होती. वाहक परवाना, विनाहेल्मेट दुचाकी चालकांना दंडही देण्यात आला. विशेष म्हणजे म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी दुपारी म्हापसा गांधी चौकात येऊन येजा करणाऱया संचारबंदीच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले.

म्हापसा पालिकेचे मुख्याधिकारी क्लेन मदेरा तसेच आमदार जोशुआ डिसोझा यांनी म्हापसा बाजारपेठेत फेरफटका मारून संपूर्ण बाजारपेठेची पाहणी केली. काही दुकाने दुपारी वेळेची मर्यादा संपूनही खुली होती. ती त्वरित बंद करण्यात आली.

 राज्यासह म्हापशातही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सर्वांनी मास्क व सोशा डिस्टन्सिंगचा नियम पाळून करून आपले आरोग्य सांभाळावे, असे आवाहन आमदार डिसोझा यांनी केले. बार्देश तालुक्यात या प्रतिनिधीने कंळगुट, हडफडे पर्रा, वेरे, नेरुल,साळगाव, आसगाव व शिवोली, थिवी, हळदोणे या भागात फेरफटका मारला असता बहुतांश दुकाने बंद असल्याचे चित्र होते. स. 11 वा. नेरुल पंचायतीजवळ मासे आणि सामान खरेदीसाठी लोकांनी गर्दी केल्याचे आढळून आल्याची तक्रार पंचायत सचिव गोविंद खलप यांच्या कडे केल्यानंतर या प्रकाराची  खबर पर्वरी पोलीस स्थानकात देण्यात आली. पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालीस फौज पाठवून गर्दी हटवली.

कोरोनाचा फौलाव रोखण्यास सहकार्य करा : आमदार डिसोझा

म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी घटनास्थळी म्हापसा बाजारपेठ व गांधी चौकात येऊन पाहणी केली. गेले सात दिवस म्हापसा व्यापारी संघटना तसेच व्यापारी व गाळेधारकांनी आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन बंद ठेवल्याचे आमदार जोशुआ यांनी सांगितले. रविवारी पहिल्या दिवशी कर्फ्यूला व्यापाऱयांनी आपल्या दुकानांचे शटर बंद करून प्रतिसाद दिला. अशाच प्रकारे पुढील चौदा दिवस सर्वांनी कडक संचारबंदी पाळून करून कोरोनाचा फैलाव कमी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले म्हापशात मोफत लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत आहे. याठिकाणी कोरोना रुग्णांसाठी 80 खाटांची सोय करण्याची तयारी सुरू आहेत. यामुळे आझिलो इस्पितळावरील ताण कमी होणार आहे, असे आमदार जोशुआ यावेळी म्हणाले.

दुपारी 1 वाजल्यानंतर कोणीही विनाकारण रस्त्यावर फिरू नये. तसे  आढळल्यास गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी यावेळी दिला.

वेळेपूर्वीच विक्रेत्यांना हटविल्याने नाराजी

नेरुल बाजारपेठेतील विक्रेत्यांना सकाळी 11 वा. पोलिसांनी हटवले. यावर येथील स्थनिक दामोदर दाभोलकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलीस स्थानिक विक्रेत्यांना हटवित असून बिगर गोमंतकीयांना सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी बाजारपेठेसाठी दुपारी 1 वाजण्याची मर्यादा ठरवून दिली असताना पोलीस सकाळी विक्रेत्यांना का उठण्यास सांगत आहेत, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान पंचायत सचिव ग्राहकांनी मात्र खरेदीसाठी गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे.

Related Stories

आपली प्रकृती स्थिर रवी नाईक यांचे स्पष्टीकरण

Amit Kulkarni

गणेश बाप्पाच्या आगमनासाठी सत्तरी तालुका सज्ज

Patil_p

आतापर्यंत 44 हजार कामगारांनी सोडला गोवा

Omkar B

कृषी खात्याने राज्याला ‘आत्मनिर्भर’ बनवावे : मुख्यमंत्री

Patil_p

चिखली कोलवाळ येथे बांध फुटल्याने पाणी शेतात

Omkar B

युवा दे कुडचडेतर्फे कोविड प्रतिबंधक उपक्रम

Amit Kulkarni
error: Content is protected !!