तरुण भारत

वास्कोत दुपारपर्यंत खरेदीसाठी लोकांची वर्दळ, नंतर कडकडीत बंद

प्रतिनिधी / वास्को

जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी वास्को शहरात व परीसरात कडकडीत बंद दिसून आला. फार्मसी व पेट्रोलपंप वगळता सर्व व्यवहार ठप्प होते. सकाळपासून दुपारपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ठेवण्यात आलेल्या शिथिलतेचा लोकांनी लाभ घेतला. सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत शहरात वर्दळ होती.

Advertisements

   कर्फ्यूचा पहिला दिवस वास्को परीसरात कडकडीत बंद राहिला. दुपारपर्यंत भाजी मार्केट, मासळी मार्केट व किराणा दुकानांसमोर गर्दी होती. लोकांची आणि वाहनांचीही वर्दळ होती. शहरात व परीसरात पोलिसांचीही गस्त होती. दुपारी एक वाजल्यानंतर सर्व व्यापाऱयांनी आपापले व्यवसाय बंद केले. त्यामुळे दुपारपासून सर्वत्र कडकडीत बंद दिसून आला. प्रवासी वाहतुकही बंद होती. मात्र, रविवार असल्याने गैरसोय जाणवली नाही. फार्मसी व पेट्रोल पंप तेवढे खुले होते. पालिका क्षेत्र आणि पंचायत परीसरातही कडक बंद होता. शहरात पूर्ण शुकशुकाट होता. मात्र, काही परीसरात दुचाक्या घेऊन नाहक फेऱया मारण्याचे प्रकार तेजीत असून अशा प्रकारांविरूध्द कडक कारवाईची मागणी लोकांकडून होत आहे. सकाळ ते दुपारपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी कर्फ्यूमध्ये शिथिलता ठेवण्यात आल्याने बाजारपेठेत नाहक गर्दीही दिसत असून या परिस्थितीवर पोलिसांकडून नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. दर दिवशी जवळपास चार हजार लोक कोरोना बाधीत आढळून येत असले तरी बऱयाच लोकांमध्ये अद्याप बेजबाबदारपणा दिसत आहे.

   वास्को शहर आरोग्य केंद्राकडे काल रविवारी 941 कोरोना बाधितांची नोंद झाली. कुठ्ठाळी आरोग्य केंद्रात 1291 तर कासांवलीच्या आरोग्य केंद्रात 1028 बाधितांची नोंद झाली. त्यामुळे मुरगाव तालुक्यात कोरोना रूग्णांची एकूण संख्या 3260 ऐवढी झाली आहे.

आजपासून कासांवलेच्या आरोग्य केंद्रात कोविड उपचार

दरम्यान, आज सोमवारपासून कासावलीच्या आरोग्य केंद्रात कोरोना रूग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. हे हॉस्पिटल बांधून पूर्ण झाल्यानंतरही त्याचा वापर सुरू झाला नव्हता. कोविडच्या संकटात या हॉस्पिटलचा वापर सुरू होणार आहे. काल रविवारी कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाना यांनी कुठ्ठाळी आरोग्य केंद्राचे डॉ. सुकोर क्वार्दोज  व इतर डॉक्टरांसमवेत या हॉस्पिटलची व उपचारांसबंधीत झालेल्या तयारीची पाहणी केली. या हॉस्पिटलमध्ये पहिल्या व दुसऱया मजल्यावर कोविड रूग्णांना सेवा देण्यात येणार आहे. तळ मजल्यावर सकाळ ते दुपारपर्यंत कोविड चाचण्याही करण्यात येतील. तसेच या हॉस्पिटलमध्ये कॅजुअल्टी विभागही सुरू असेल.

Related Stories

प्ले-ऑफसाठी नॉर्थईस्टला ब्लास्टर्सविरुद्ध आज फक्त बरोबरीची आवश्यकता

Amit Kulkarni

‘इफ्फी’त पुढील वर्षी खासगी क्षेत्रालाही स्थान

Abhijeet Shinde

कोरोनामुळे मृत्यू आलेल्यांना नुकसान भारपाई द्यावी

Amit Kulkarni

पाच पालिकांसाठी मंगळवारी 137 अर्ज

Amit Kulkarni

जवाहर नवोदयची ‘ती’ मुले दिल्लीस रवाना

Omkar B

डान्स बारना मान्यता देण्यात मुख्यमंत्र्यांचाच हात

Amit Kulkarni
error: Content is protected !!