तरुण भारत

डिचोलीत कडक अंमलबजावणी

सकाळी बाजारात लोकांनी केली गर्दी : समाजिक सुरक्षा अंतराचा फज्जा. अनेक ठिकाणी पोलिसांना लोकांना हाकलावे लागले.

डिचोली/प्रतिनिधी

Advertisements

राज्य सरकारने जारी केलेल्या कर्फ्य?ची कडक अंमलबजावणी डिचोलीत करण्यात आली. डिचोली पोलिसांनी दु. 1 नंतर कडक गस्त घालताना विनाकारण बाहेर फिरणाऱया लोकांना विशेष पोलिसी शैलीत हाकलून लावले. सकाळच्या वेळी मात्र दुकाने उघडल्यानंतर लोकांनी दुकानांवर बरीच गर्दी केल्याचे दिसून आले. तेथेही पोलिसांना हस्तक्षेप करीत लोकांना सामाजिक सुरक्षा अंतर राखण्याची सुचना द्यावी लागली. संध्याकाळी मात्र सर्वत्र शुकशुकाट होता.

डिचोली नगरपालिकेतर्फे बुधवार ते रवि. दि. 9 मे पर्यंत कडक आणि संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. परंतु सरकारने राज्यव्यापी कर्फ्य?ची रविवारपासून घोषणा केल्याने रविवारचा लॉकडाऊन उठविण्यात आला आणि सरकारच्या कर्फ्य?चे पालन करण्याचे विशेष बैठकीत ठरविण्यात आले. त्यानुसार रविवारी सकाळी चार दिवसां?नंतर बाजारातील आणि शहरातील जिवनावश्यक वस्तु?ची दुकाने उघडण्यात आली. आणि त्यावर लोकांनी बरीच गर्दी केली होती.

गर्दी झालेल्या दुकानांवर पोलिसांनी लोकांना सामजिक सुरक्षा अंतर पाळण्याचे आवाहन केले. व दुपारी 1 वा. नंतर बाजारातील व शहरातील दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. व्यापाऱयांनीही आपली दुकाने बंद केली. तसेच दु. 1 वाजण्यापूर्वीच लोकांनीही आपल्या घराची वाट धरली. त्यानंतर मात्र विनाकारण फिरणाऱया लोकांवर पोलिसांनी आपल्या विशेष शैलीत कारवाई केली. तसेच जिवनावश्यक वस्तु?च्या व्यतिरिक्त इतर सामानांच्या दुकानदारांना अकारण दुकाने उघडल्याबध्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली.

डिचोली पोलीस निरीक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोली पोलीस स्थानकातील उपनिरीक्षक, सहाय्यक उपनिरीक्षक व इतर पोलीस कर्मचारी डिचोली तालुक्मयातील विविध भागांमध्ये कर्फ्य?च्या कडक अंमलबजवणीसाठी कार्यरत होते.

Related Stories

सरकारने ऊस शेतकऱयांचे हित सांभाळले : केपेकर

Omkar B

मडगावच्या न्यू मार्केटवरून नाटय़मय घडामोडी

Omkar B

ऑक्सिजन तुटवडय़ाची सीबीआय चौकशी व्हावी

Omkar B

अटक केलीच तर 25 हजारांच्या बॉण्डवर सोडा

Patil_p

इमॅजिन पणजीच्या बैठकीत विविध प्रकल्पांचा आढावा

Patil_p

लॉबेरा आयएसएलची शील्ड आणि चषक जिंकणारे पहिले प्रशिक्षक

Patil_p
error: Content is protected !!