तरुण भारत

कुडचडेत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

मात्र लसीकरण मोहिमेस अपेक्षेइतका प्रतिसाद नाही

प्रतिनिधी / कुडचडे

Advertisements

कुडचडे आरोग्य केंद्राच्या अखत्यारितील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून मिळालेल्या माहितीप्रमाणे, दिवसाला 150 लोकांची चाचणी करण्यात येत आहे आणि त्यातील 25 टक्के बाधित असल्याचे आढळून येत आहे. त्याचबरोबर केंद्रात कोविड प्रतिबंधक लसीकरण सकाळी 9 ते संध्याकाळी 4 पर्यंत रोज सुरू आहे.

सध्या कुडचडेत तपासणीच्या दरम्यान दिवसाला 40 ते 50 कोरोनाबाधित सापडत असून यावर आताच नियंत्रण आणण्याची गरज आहे. त्यासाठी कुडचडेतील लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे अशी अपेक्षा लोक करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कुडचडे केंद्रात बुधवारी 94, गुरुवारी 116, तर शुक्रवारी सकाळच्या सत्रात 45 वर्षांच्या वरील फक्त 79 नागरिकांनी लस घेतली होती. ज्या प्रमाणे कुडचडेची जनसंख्या आहे त्याच्याशी तुलना करता सदर आकडा एकदम कमी आहे. त्यामुळे लोकांनी सदर लस घ्यावी यासाठी लोकप्रतिनिधींनी आताच पुढाकार घेण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. आज कुडचडेत कोविडचे भय निर्माण झालेले दिसून येत आहे. असे असले, तरी बरेच लोक आपल्या मित्रांना व सग्यासोयऱयांना लस घेण्यास भीती वाटत असल्याचे सांगत आहेत असे ऐकू येऊ लागले आहे.

‘नवीन रुग्णालय इमारतीत रुग्णांना ठेवण्याची तयारी करा’

कुडचडेत सरकारी रुग्णालयाची इमारत तयार झाली आहे. ती फक्त लसीकरणासाठीच उपयोगात न आणता या कोविड महामारीचा वाढता जोर बघता सदर इमारतीत कुडचडेतील कोविड रुग्ण तरी ठेवण्यासाठी तयारी केली पाहिजे. यासाठी खाटांची आवश्यकता आल्यास त्या पुरविण्यास आपण तयार आहे, असे नगरसेवक बाळकृष्ण होडारकर यांनी सांगितले आहे. सरकारने अशी व्यवस्था करून सदर खाटांना ऑक्सिजनची जोड देण्यास प्राधान्य द्यावे. त्याचबरोबर सरकारला आपण सांगू इच्छितो की, हवे असल्यास कुडचडेत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यास आपण व आपल्याबरोबर असलेले नगरसेवक सुशांत नाईक, अपर्णा प्रभुदेसाई, प्रदीप नाईक, क्लेमेंटिना फर्नांडिस व मंगलदास घाडी हे तयार आहेत. तसेच कुडचडेतील जनतेला या महामारीत अन्य कशाचीही गरज भासल्यास त्याचीही पूर्तता आपण करेन, असे होडारकर यांनी या प्रतिनिधीला सांगितले.

Related Stories

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार

Patil_p

200 युनिटपेक्षा कमी विज वापरणाऱया ग्राहकांना सरकारने मोफत विज द्यावी

Omkar B

तिसऱया लाटेसाठी भाजपची आरोग्य स्वयंसेवक मोहीम

Amit Kulkarni

पाज-शिरोडा गावाला चिंता पाणी टंचाईची

Omkar B

युवतीच्या हाताचा चावा घेतलेला जामीनमुक्त

Omkar B

वैयक्तिक फायद्यासाठीच भिंगीचा भाजपात प्रवेश

Amit Kulkarni
error: Content is protected !!