तरुण भारत

नंदगड बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी

वार्ताहर / नंदगड

सोमवारपासून सर्वत्र लॉकडाऊन होत असल्याने नंदगडमधील सर्व किराणा दुकानदारांनी आपली दुकाने पंधरा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवारपासून काहीच मिळणार नाही, या समजुतीने रविवारी नंदगड बाजारात खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Advertisements

नंदगडमध्ये कोरोनाने सहा जणांचा मृत्यू झाला, तर अनेक घरांमध्ये कोरोनावर उपचार घेणारे रुग्ण आहेत. आगामी काही दिवसात सदर रोगाचा फैलाव होऊन त्याची लागण इतरांना होऊ नये, म्हणून नंदगड गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत आवारात झालेल्या बैठकीत घेण्यात आला
होता.

नंदगड गावच्या बाजारपेठेवर परिसरातील 40 ते 50 गावे अवलंब अवलंबून आहेत. त्यातच शनिवार व रविवार असे दोनच दिवस किराणा बाजार खरेदी करण्यासाठी जनतेला मिळाले होते. त्यामुळे दोन्ही दिवस सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत हजारो लोकांनी साहित्याची खरेदी केली. त्यामुळे नंदगड बाजारपेठेत लोकांची मोठी गर्दी झाली होती. त्यातच दुचाकी व चार चाकी बाजारपेठेत घातल्याने त्या गर्दीत आणखी भर पडली होती. तरीही  गर्दीतून वाट काढताना लोक दिसत होते.

Related Stories

चार स्थानिक संस्थांवर कोरोनामुळे प्रशासकीय राजवट

Amit Kulkarni

फार्महाऊसवर झोपलेल्या वॉचमनचा खून

Omkar B

मासे पकडण्यासाठी गेलेल्या बालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Abhijeet Shinde

हैदराबादच्या हवाई प्रवाशांमध्ये कमालीची वाढ

Patil_p

वेदिकेच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस

Patil_p

आरोग्य-शिक्षण क्षेत्र बळकट करण्यावर भर

Amit Kulkarni
error: Content is protected !!