तरुण भारत

‘ओन्ली वॉकिंग, नो व्हेईकल’

आजपासून कठोर लॉकडाऊन, सकाळी 6 ते 10 पर्यंत जीवनावश्यक खरेदीसाठी मुभा, वाहन प्रवेशावर पूर्णपणे निर्बंध 

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे आता सोमवार दि. 10 ते सोमवार दि. 24 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या काळात खरेदीसाठी येणाऱयांना पायीच यावे लागणार आहे. कारण वाहन प्रवेशावर पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे ‘ओन्ली वॉकिंग, नो व्हेईकल’ म्हणण्याची वेळ साऱयांवर आली आहे. या काळात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱयांचीही गय केली जाणार नाही. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱयांना दंड तर आततायीपणा करणाऱयांना पोलिसांचा प्रसादही (लाठीचा) मिळणार आहे.

लॉकडाऊन काळात सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. त्या काळात गरजूंना फिरण्यास मुभा देण्यात येणार आहे. मात्र, वाहने न घेताच त्यांना बाहेर पडावे लागणार आहे. त्यामुळे आपण असलेल्या परिसरातच त्यांना वस्तू खरेदी कराव्या लागणार आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी अशा प्रकारे खरेदी करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.

हॉस्पिटल, औषध खरेदी, तसेच इतर अत्यावश्यक कामांसाठी बाहेर जाणाऱयांना मुभा देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी त्याबाबतची कागदपत्रे आपल्याकडे असणे गरजेचे आहे. कोणीही रस्त्यावर विनाकारण फिरत असतील तर त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. विमान प्रवास किंवा रेल्वे प्रवास करणाऱया व्यक्तींना आपण खरेदी केलेले तिकीट दाखवावे लागणार आहे. रिक्षाचालकांनी ऑटो स्टँडवर रिक्षा थांबवू नये, अशी सूचनाही देण्यात आली आहे. एकूणच वाहने घेऊन फिरणाऱया व्यक्तींवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे.

जिल्हाधिकाऱयांचे आवाहन

कडक लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. त्यासाठी मार्गसूची जारी करण्यात आली आहे. समस्त जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांनी केले आहे. विनाकारण रस्त्यावर फिरू नका, त्यामुळे स्वतःच्या कुटुंबाबरोबरच स्वतःलाही धोका आहे. तेव्हा प्रत्येकाने काळजी घेऊन अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा, असे त्यांनी नागरिकांना कळविले आहे.

पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन

लॉकडाऊन काळात वाहनांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक कारणासाठी वाहनांचा उपयोग करावा. विनाकारण कोणीही वाहन घेऊन आत प्रवेश करत असेल तर त्याचे वाहन जप्त करण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनचे नियम तोडू नका, त्यामुळे तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तेव्हा जनतेने काळजीपूर्वक लॉकडाऊनचे नियम पाळावेत, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी केले आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे

सोमवार दि. 10 पासून 24 पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनचे काटेकोर पालन करा, अन्यथा तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी दिला आहे. शहरात येणाऱया सर्व सीमा सीलबंद करण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी वाहनांची तपासणी केली जाणार आहे. अनावश्यक बाहेर पडलात तर वाहने जप्त केली जाणार आहेत. तेव्हा प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

शहरातील अनेक रस्ते बंद होणार

या लॉकडाऊन काळात शहरातील अनेक रस्ते बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांना शहरात येणे अवघड जाणार आहे. केवळ पायी चालणाऱयांना ये-जा करण्यासाठी रस्ता सोडण्यात येणार आहे. मुख्य बाजारपेठेकडे येताना आता उपनगर तसेच ग्रामीण भागातून पायीच यावे लागणार आहे. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दी कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  लॉकडाऊन काळात सकाळी 10 नंतर फिरण्यावरही बंदी घालण्यात येणार आहे. केवळ अत्यावश्यक असलेल्या कामासाठीच बाहेर पडावे लागणार आहे. या काळात कोणीही विनाकारण बाहेर पडत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनचे नियम मोडू नयेत. अन्यथा, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Related Stories

अटीतटीच्या लढतीत अरविंद पाटील विजयी

Patil_p

प्रतापसिंह थोरात यांना मुख्यमंत्री पदक

Patil_p

बेळगाव पोटनिवडणूक 17 एप्रिलला

Amit Kulkarni

तिसऱया रेल्वेगेटजवळ धाडसी दरोडा

Omkar B

कंग्राळी बुद्रुक वॉर्ड क्र. 2 मधील उमेदवारांना वाढता पाठिंबा

Patil_p

कडोली साहित्य संमेलन आज

Patil_p
error: Content is protected !!