तरुण भारत

कैलास स्मशानभूमीत 2 वर्षात कोविडच्या 2201 जणांवर अंत्यसंस्कार

प्रतिनिधी / सातारा : 

गतवर्षी मार्चमध्ये कोरोनाची एन्ट्री झाली. जिल्ह्यात झालेल्या 2574 मृत्यूपैकी मे महिन्याच्या दि. 10 पर्यत कैलास स्मशानभूमीत 2 हजार 201 अंत्यसंस्कार झाले. गेल्या दहा दिवसात 322 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांच्यावर कोरोनाच्या निकषानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. झालेल्या अंत्यसंस्कारापैकी 80 टक्के अंत्यसंस्कार हे सातारा शहर व तालुक्यातील 12 गावे वगळता आहेत. कैलास स्मशानभूमीत बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट आणि सातारा पालिकेच्यावतीने परफेक्ट नियोजन केले जात आहे.  

Advertisements

कोरोनाचा विस्तार झपाटय़ाने होत असून अनेकांचा त्यामध्ये मृत्यू होत आहे. गतवर्षीपासून कोरोना बाधितांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. हे मृत्यू होण्याचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठे आहे. दोन वर्षात कैलास स्मशानभूमीत 4089 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापैकी 2 हजार 201 जण हे कोरोनाने मृत्यू आलेले होते. तर दोन वर्षात 1804 जण हे सर्वसामान्य मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. गतवर्षीही ऑगस्ट आणि स्पटेबरमध्ये मृत्यचे प्रमाण वाढले होते. यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात मृत्यूचे प्रमाण वाढले गेले आहे. त्यामुळे कैलास स्मशानभूमीवर ताण असून कैलास स्मशानभूमीत झालेल्या अंत्यसंस्कारापैकी 80 टक्के अंत्यसंस्कार हे सातारा शहर व शहरालगतच्या 12 गावातील नाहीत. जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील कोरोना बाधितांचा समावेश आहे.  

महिना 2020 (कंसात नैसर्गिक मृत्यू) 2021
मार्च 00 (84)                                 65 (132)
एप्रिल 3 (96)                                 535(147)
मे 14(130)                                    322(41)
जुन 20(134)
जुलै 56(107)
ऑगस्ट 204(152)
सप्टेंबर 423(156)
ऑक्टोबर 246(146)
नोव्हेंबर 123(139)
डिसेंबर 87(165)

Related Stories

सातारा पोस्ट कार्यालयातला एकमेव धनादेश स्कॅनर पडला बंद

Abhijeet Shinde

सातारा : अवघ्या साडेतीन वर्षाच्या खगोलप्रेमीचा जागतिक विक्रम

datta jadhav

‘त्या ‘ बालकाच्या मदतीसाठी सरसावले बार्शीतले तरुण

Abhijeet Shinde

सातारा ते पुणे महामार्गाची लवकरच होणार दुरुस्ती

datta jadhav

सातारा : नागठाणेत चोरट्यांचा धुमाकूळ

Abhijeet Shinde

सातारा जिल्हा रुग्णालय समस्यांच्या गर्तेत,वर नागरिकांच्या आजारपणाला ही निमंत्रण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!