तरुण भारत

कोरोना रूग्णांना आता घरीच ऑक्सीजन मिळणार

प्रतिनिधी/ महाबळेश्वर

कोरोना रूग्णांना आता घरीच ऑक्सीजनची सुविधा देण्याचा निर्णय महाबळेश्वर येथील ग्रामीण रूग्णालयाने घेतला आहे, अशी माहीती ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. एस. आर. चौगुले यांनी दिली. यावेळी डॉ. पी. के. देशमुख उपस्थित होते.  

Advertisements

  कोरोनाचा संसर्ग झपाटय़ाने वाढत असून अनेक रूग्णांना ऑक्सीजन व व्हेंटिलेटर बेड शोधण्यासाठी जिह्यात सर्वत्र धावपळ करावी लागत आहे. ही  धावपळ थांबवण्यासाठी महाबळेश्वर पालिकेच्या वतीने आठ प्रभागात नागरिकांच्या तपासण्या सुरु आहेत. परंतु तरी देखील काही नागरीक लक्षणे दिसली तरी सांगत नाहीत, त्यामुळे आजार बळावतो मग हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची वेळ येते. ही वेळ येवू नये म्हणून नागरिकांनी आजार अंगावर काढू नये, तातडीने उपचार करून घ्यावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. दरम्यान अनेक रूग्णांना आता ऑक्सीजनची आवश्यकता भासत असून ऑक्सीजनसाठी रूग्णांना रूग्णालयात भरती व्हावे लागत आहे. परंतु आता या पुढे रूग्णांना केवळ ऑक्सीजनसाठी रूग्णालयात जावे लागणार नाही, ज्यांना ऑक्सीजनची आवश्यकता आहे, अशा रूग्णांनी ग्रामीण रूग्णालयाशी संपर्क साधावा. त्यामुळे नागरिकांनी बाजीराव आंब्राळे, सोजू वर्गीस यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन वैद्यकिय अधिकारी डॉ. एस. आर. चौगुले यांनी केले आहे. 

काही दिवसांपुर्वी बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन ऑक्सीजन कॉन्सिट्टेर दिली आहेत. त्याचा वापर घरीच करून घेण्यासाठी रूग्णालयाकडून नागरिकांना आवाहन केले आहे. रूग्णालयाचे डॉक्टर रूग्णाच्या घरी येवून ऑक्सीजन लावणार आहेत आणि त्या बाबत घरातील नातेवाईकांना ऑपरेट करण्याविषयी अधिक माहीती देणार आहेत, अशी माहीती डॉ. एस. आर. चौगुले यांनी दिली. यावेळी प्रशासकिय अधिकारी जीतीन प्रसिध्द उद्योगपती डी. एल. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.  

Related Stories

उपनगराध्यक्ष मनोज शेंडे आज मांडणार 307 कोटींच बजेट

Amit Kulkarni

फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळेमुळे लवकर निदान व उपचार शक्य : नितीन गडकरी

Rohan_P

सातारा : अतीत येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई

triratna

पुरबाधित जिल्ह्यातील व्यापारी, टपरीधारक, व्यावसायिकांना ठाकरे सरकारचा दिलासा

Rohan_P

सातारा : खबालवाडीत आणखी दोन रुग्णांची भर

triratna

नगराध्यक्षांनी पदाचा गैरवापर करून मानधन घेतले

Patil_p
error: Content is protected !!