तरुण भारत

सांगली जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य ‘सलाईनवर’!

नत्र, स्फुरदचे प्रमाण झाले कमी : कृषि विभागाचा अहवाल : उत्पादनावर परिणाम शक्य  

सुभाष वाघमोडे / सांगली

Advertisements

रासायनिक खते आणि पाण्याच्या बेसुमार व असंतुलित वापरामुळे जिल्ह्यातील जमिनीचा पोत घसरला आहे. मातीतील नत्र, स्फुरद आणि पालाशचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे कृषि विभागाने केलेल्या तपासणी अहवालामध्ये स्पष्ट झाले आहे. याचा परिणाम उत्पादन घटण्यात होण्याची शक्यता असून जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय श्वाश्वत शेती अभियानांतर्गत कृषि विभागाने जिल्ह्यातील जमिनीची आरोग्य पत्रिका तयार केली आहे. जमिनीमध्ये किती प्रमाणात नत्र, स्फुरद आणि पालाशचे प्रमाणत किती आहे, अन्य द्रव्यांची सुपिकता किती आहे, याची मातीपरीक्षण करून तपासणी केली आहे. अहवालामध्ये जमिनीची सुपीकता निर्देशांक घसरल्याचे दिसून आले आहे. रासायनिक खते आणि जादा पाणी यामुळे तसेच पावसाने माती वाहून गेल्याने अन्यद्रव्याची सुपिकता घसरत आहे. सधन पट्ट्यात उसाचे क्षेत्र वाढत आहे. शेतकरी खते आणि पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापरत असल्याने जमीन क्षारपड होत आहे. मिरज पश्चिम, इस्लामपूर, आदी भागात हे प्रमाण वाढत आहे.

दरम्यान, सरासरीपेक्षा तिन्ही मुलद्रव्यांचे प्रमाण कमी असल्याचे अहवालानुसार स्पष्ट झाल्याने जमिनीच्या सुपिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. परिणामी बेसुमार पाणी आणि खतांचा वापर करु नये, वेळीवेळी मातपरिक्षण करून कमी घटकांच्या वाढीसाठा उपायोजना कराव्यात अशाही सूचना कृषि शेतकऱ्यांना दिल्या आहेत.

कृषि विभागाच्या निर्देशानुसार 2.26 ते 2.75 भरपूर तर 2.76 पेक्षा अधिक असल्यास सुपिकता अत्यंत चांगली मानली जाते. तर 0.50 ते 0.75 अत्यंत कमी, 0.76 ते 1.25 कमी, 1.26 ते 2.25 मध्यम प्रमाण आहे. जमिनीमध्ये नत्राचे प्रमाण कमी सरासरी 1.04, स्फुरद 2.02, तर पालाशचे 1.90 इतके प्रमाण आहे. आटपाडी तालुक्यात 0.92, पलूस 0.94, खानापूर 0.95 तर शिराळा तालुक्यात 0.89 इकते नत्राचे प्रमाण आहे. तर सर्व तालुक्यात पालाश आणि स्फुरदचे प्रमाण मध्यम आहे. एकमेव पलूस तालुक्यात सरासरी 2.46 इतके म्हणजे भरपूर प्रमाणत आहे.

तालुका नत्र    स्फुरद पालाश
आटपाडी   0.92    1.26    1.87
जत            1.08    1.81     1.92
कडेगाव                1.10    2.06     1.83
कवठेमहांकाळ     1.12    2.20     1.77
खानापूर               0.95    2.03     1.76
मिरज                 1.22    2.01     203
पलूस            0.94    2.46    2.13
शिराळा                0.89    2.07     1.86
तासगाव               1.18    2.17     1.98
वाळवा                 1.03     2.22    1.93
एकूण सरासरी  1.04     2.02    1.90

Related Stories

घरफोडी करणारी टोळी अटक

Abhijeet Shinde

…तर अपेक्स प्रकरण सीबीआय पर्यंत नेणार : आशिष शेलार

Abhijeet Shinde

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरलाच व्हावे – आ. गोपीचंद पडळकर

Abhijeet Shinde

मिरज स्टेशन आणि स्टँड परिसरावर लुटारुंचा कब्जा

Abhijeet Shinde

सांगली जिल्हय़ात नवे 886 रूग्ण, तर 716 कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

मिरजेत दरोडा टाकण्यासाठी आलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील चौघांना अटक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!