तरुण भारत

म. ए. समितीच्या आयसोलेशन केंद्राचे लोकार्पण

गरजूंना केंद्राचा उपयोग करून घेण्याचे आवाहन : आयसोलेशनसाठी विविध व्यक्ती-संघटनांच्या माध्यमातून मदतीचा हात्

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

बेळगाव परिसरातील कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आयसोलेशन सेंटरचे रविवारी लोकार्पण करण्यात आले. रोपटय़ाला पाणी घालून हा लोकार्पण सोहळा पार पडला. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, जत्तीमठ देवस्थानचे अध्यक्ष दत्ता जाधव, मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव, उद्योजक महादेव चौगुले, अजित यादव, शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर, माजी नगरसेवक पंढरी परब, माजी महापौर महेश नाईक, मोहन चिगरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

प्रारंभी प्रास्ताविक करताना मदन बामणे यांनी कोरोना आयसोलेशन सेंटर सुरू करण्यामागचा उद्देश सांगितला. दत्ता जाधव यांनी ज्यांना घरी आयसोलेशन करणे शक्मय नाही अशांनी या सेंटरचा उपयोग करावा, असे आवाहन केले. शुभम शेळके यांनी प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी आपण हे आयसोलेशन सेंटर सुरू करत असताना प्रशासनाने सहकार्य न करण्याचे ठरविले आहे, हे थांबले पाहिजे आणि ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी आप्पासाहेब गुरव, प्रकाश शिरोळकर, सागर पाटील, पंढरी परब यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव पाटील यांनी केले.

अनेकांचा मदतीचा हात

मराठा मंदिर येथे सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटरसाठी विविध व्यक्ती व संघटनांच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. क्रिश जीवन फौंडेशन (अनुसया कुकडोळकर) 1 लाख रुपये, माजी महापौर महेश नाईक यांनी 5 हजार, महेश पावले 5 हजार रुपये, प्राची टेडर्स (आरती शहा) यांच्याकडून 4 ऑक्सिमीटर, एकता महिला सोसायटी 5 हजार, सुरेश पिसे 5 हजार, जायंट्स सखी 40 हजार, एकता महिला मंडळ 11 हजार, दीपक किल्लेकर 11 हजार, बेळगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी संघ सुळगा (हिं) 14 हजार, वायुपुत्र सेना मंडळ नवी गल्ली शहापूर 50 डस्टबिन व टे, व्हेगा हेल्मेट 2 मोबाईल टॉयलेट, वॉशेबल पीपीई किट 40, फेसशिल्ड 40, अमर अकनोजी 21 हजार, अनंत पाटील 21 हजार, नारायण अमरोळकर 5 हजार, राजू पवार 5 हजार, शांता ब्युटीपार्लर 5 हजार, गणेश दड्डीकर 5 हजार, नारायण जाधव प्रति÷ान 5 हजार, नरवीर प्रति÷ान 10 हजार, माजी आमदार मनोहर किणेकर 11 हजार, विमल महिला सोसायटी 11 हजार, पीव्हीजी ग्रुपतर्फे 700 मास्क, 3 हॉट किटली, 4 थर्मामीटर, दीपक पवार 15 हजार, विनायक पवार 5 हजार, विनायक पाटील 40 बेडशीट, मराठा मंडळ 1984-1985 बॅचतर्फे 40 ब्लँकेट असे विविध साहित्य मदत स्वरूपात देण्यात आले आहे. याशिवाय इतरांनीही आपल्याला शक्मय तितकी रक्कम व साहित्य दिले आहे.

म. ए. समितीच्या आयसोलेशन सेंटरला एकता महिला मंडळातर्पे मदत

महाराष्ट्र एकीकरण समिती ही फक्त सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मर्यादित नसून ती सीमाभागातील जनतेच्या रक्षणासाठीसुद्धा कार्यरत आहे, हे युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेत रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये व खासगी रुग्णालयात बेड मिळेनासे झाले आहेत, हे लक्षात घेऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन समितीने मराठा मंदिरमध्ये आयसोलेशन सेंटर सुरू केले आहे.

कोविड रुग्णांची परवड थांबविण्यासाठी धडपडत असणाऱया समितीच्या या कार्याला हातभार लावावा, या उद्देशाने कंग्राळ गल्लीतील एकता महिला मंडळाच्या पदाधिकाऱयांनी मराठा मंदिर येथील समितीच्या आयसोलेशन सेंटरला भेट देऊन 11 हजार रुपयांची आर्थिक मदत शुभम शेळके व मदन बामणे यांच्याकडे सुपूर्द केली.=यावेळी आयसोलेशन सेंटर चालविण्यासाठी खूप खर्च येणार असून इतरही महिला मंडळांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन एकता महिला मंडळाच्यावतीने करण्यात आले. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा रूपा दरवंदर, विद्या सरनोबत, शिला कावळे, आशा सुपली, वैशाली मोरे उपस्थित होत्या.

Related Stories

टॅक्टरची धडक बसल्याने विद्युतखांब कोसळून नुकसान

Amit Kulkarni

दुसऱया टप्प्यातील निवडणुकीसाठी 9 हजार 89 अर्ज दाखल

Patil_p

निवृत्त पोलीस उपनिरीक्षकासह पाच जणांचा मृत्यू

Patil_p

न्यू वंटमुरी अध्यक्षपदी महादेवी चौगुला, उपाध्यक्षपदी रामाप्पा हंचिनमनी

Amit Kulkarni

पथदीप स्मार्ट मात्र फ्युजबॉक्स लोंबकळत!

Amit Kulkarni

संकेश्वरमध्ये बाहेर फिरणाऱयांची धरपकड

Patil_p
error: Content is protected !!