तरुण भारत

मैंगो रसमलाई

मैत्रिणींनो, सध्या तुम्ही मँगो रसमलई करू शकता.

साहित्य : एक लीटर दूध, लिंबाचा रस दोन  चमचे, दोन चमचे कॉर्न फ्लोर. रबडीसाठी अर्धा लीटर दूध, आंब्याचा रस आणि साखर प्रत्येकी अर्धा कप, वेलची पूड, पिस्त्याचे काप, केशराच्या कांडय़ा. पाकासाठी एक कप साखर आणि दोन कप पाणी घ्या. 

Advertisements

 कृती : एका पातेल्यात दूध गरम करायला ठेवा. दुधाला उकळी आल्यानंतर त्यात लिंबाचा रस घाला. या दुधातलं पाणी वेगळं करा. दुधाच्या नासलेल्या भागावर थंड पाणी ओता. या गोळ्यातलं जास्तीचं पाणी काढून टाका. दुधाचा गोळा थोडा मळून घ्या. गोळ्याचा आकार कमी झाल्यावर त्यात थोडं कॉर्नफ्लोर घालून पुन्हा मळा. त्याचे चपटे गोळे करून घ्या. हे गोळे दहा ते पंधरा मिनिटं सेट करायला ठेवा. आता साखरेचा पाक करून घ्या. यानंतर या पाकात रसमलईचे गोळे घालून साधारण दहा मिनिटं उकळून घ्या. आता गॅस बंद करा. आता दुसर्या पातेल्यात रबडीसाठीचं दूध गरम करायला ठेवा. त्यात वेलची पूड, पिस्त्याचे काप आणि केशराच्या कांडय़ा घाला. हे दूध थंड झाल्यानंतर त्यात आंब्याचा रस घालून हलवून घ्या. या रबडीमध्ये रसमलईचे गोळे घाला. चार तास फ्रीजमध्ये ठेवा. थंडगार खायला द्या.

Related Stories

साबुदाणा वडा

tarunbharat

खरबूज मिल्क शेक

tarunbharat

झटपट चविष्ट डिश

tarunbharat

शेवया कटलेट

tarunbharat

मस्त टोमॅटो पुरी

Amit Kulkarni

मेथी मशरूम

Omkar B
error: Content is protected !!