तरुण भारत

कडेगावच्या सर्वांगीण विकासासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर

प्रतिनिधी / कडेगाव

नगरविकास विभागाकडून नगरपालिकाना वैशिष्टयपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत कडेगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम व आमदार मोहनराव कदम यांच्या प्रयत्नाने दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती सागरेश्वर सहकारी सुत गिरणीचे अध्यक्ष शांताराम बापू कदम यांनी दिली.

Advertisements

यावेळी बोलताना शांताराम कदम म्हणाले, स्व. डॉ. पतंगराव कदम यांनी कडेगाव शहराला राजधानी म्हणून विकास कामे केली. त्यांच्या स्वप्नांतील सुंदर शहर राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम आणि आमदार मोहनराव कदम यांच्या माध्यमातून बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
शहराच्य सर्वांगीण विकासासाठी डॉ. विश्वजित कदम व आमदार मोहनराव कदम यांच्या प्रयत्नाने दोन कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

या निधीतून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते निमसोड रोड स्मशानभूमीपर्यंत रस्ता व गटर 85 लाख, नागपूर वसाहतमधील अंतर्गत रस्ते कॉक्रिटीकरण 25 लाख, नागपूर वसाहत कडे जाणाऱ्या रस्त्यावर पूल बांधणे 25 लाख, ग्रामीण रुग्णालय ते शिंदे नगरकडे जाणारा रस्ता 15 लाख, स्वामी समर्थ मठ ते अशोकराव मोरे यांच्या घरापर्यंत गटर व रस्ता करणे मंजूर निधी 15 लाख, डॉ. रेणुशे हॉस्पिटल ते वडतुकाई मंदिरापर्यंत गटर व रस्ता करणे मंजूर निधी 20 लाख, अन्य विकास कामे 15 लाख ही कामे मार्गी लागणार आहेत.

यावेळी ज्येष्ठ नेते सुरेशचंद्र थोरात, सोनहिरा साखर कारखाना संचालक दिपक भोसले, माजी सरपंच विजय शिंदे, नगराध्यक्षा संगीता राऊत, उपनगराध्यक्ष दिनकर जाधव, नगरसेवक साजिद पाटील, राजू जाधव, सागर सूर्यवंशी, सुनील पवार, श्रीरंग माळी, नगरसेविका आकांक्षा जाधव, नीता देसाई, संगीता जाधव, रिजवाना मुल्ला उपस्थित होते.

Related Stories

सांगली : दिघंची मधील कंटेन्मेंट झोन काढण्यासाठी पालकमत्र्यांकडे साकडे

Abhijeet Shinde

राष्ट्रवादी आपल्या दारी उपक्रमाला प्रारंभ

Abhijeet Shinde

सांगली : जतमध्ये तरुणाची आत्महत्या

Abhijeet Shinde

सांगली : हरिपूरमधील श्री संगमेश्वरची श्रावणी सोमवार यात्रा रद्द

Abhijeet Shinde

सांगली : मिरजेत साडेतीन लाखांचा सुगंधी तंबाखू, गुटखा जप्त

Abhijeet Shinde

किनरेवाडी येथे विहिरीत पडलेल्या बैलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश

Abhijeet Shinde
error: Content is protected !!