तरुण भारत

भारतामध्ये ओप्पोकडून ई-स्टोअर लाँच

विविध उत्पादने मिळणार सवलतीच्या दरात – ग्राहकांच्या सुरक्षेवर भर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

चिनी स्मार्टफोन कंपनी ओप्पोने भारतामध्ये आपला ऑफिशियल ई-स्टोअर सुरू केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ई-स्टोअरच्या ग्राहकांची सुरक्षा लक्षात घेत याचे सादरीकरण करण्यात आल्याची माहिती आहे.

कोविडच्या प्रभावामुळे घरात बसून कंपनीची सर्व उत्पादने खरेदी करण्याची सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे. स्टोअरच्या सादरीकरणप्रसंगी सवलतीमध्ये कंपनी 1 रुपयामध्ये उत्पादनांची खरेदी करण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहे. सवलतीमध्ये खरेदी करण्याची संधी ही 11 ते 17 मे पर्यंत राहणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.

सवलतीच्या दरम्यान ग्राहकांना नो कॉस्ट इएमआय, इंस्टंट कॅशबॅक यासारख्या सवलतीचा लाभ मिळवता येणार आहे. स्टोअरच्या आधारे 80 प्रकारचे उत्पादन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये स्मार्टफोनसह व्हेयरेबल्स, ऑडिओ, ऍक्सेसरीजचा समावेश राहणार आहे.

सवलतीचा लाभ

आप्पोने एचडीएफसी बँक, स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक, कोटक बँक आणि बजाज फिनसर्व्हसोबत भागीदारी केली आहे. यामुळे इएमआय कॉस्टसह अन्य सवलती मिळणार आहेत. बँकेच्या डेबिट आणि कार्डच्या मदतीने खरेदी केल्यास 10 टक्के कॅशबॅक मिळणार आहे.

Related Stories

भारतीय कंपन्यांचे पेटंटसाठी अर्ज सादर

Patil_p

नेटफ्लिक्सच्या ग्राहकात वाढ

Patil_p

तेजीचा ‘लॉक’ लागेल?

Patil_p

ऍमेझॉनची विविध व्यवसायातील गुंतवणूक 11400 कोटींवर

Omkar B

‘एचपी’च्या कॉम्प्युटर्सना मागणी वाढली

Patil_p

विदेशी चलनातील प्रवाहामुळे सेन्सेक्स मजबूत

Patil_p
error: Content is protected !!