तरुण भारत

एचडीएफसी बँकेने सीएससी ग्रामीण ई-स्टोअरमधील हिस्सेदारी घेतली

गावागावात पोहोचण्यासाठी बँकेची योजना – दहा कोटी रुपयांचा व्यवहार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

गावागावात बँकेचे जाळे पोहोचविण्यासाठी एचडीएफसी बँक नवीन पावले उचलत आहे. यामध्ये बँकेने सरकारच्या अधिकारात असणारी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) ग्रामीण ई-स्टोअरमधील 1.5 टक्क्यांची हिस्सेदारी खरेदी करणार असल्याची माहिती आहे. बँक ही हिस्सेदारी अंदाजे 10 केटी रुपयाना घेणार असल्याची माहिती आहे. मागच्या वर्षातील डिसेंबरमध्ये टाटा समूहातील सब्सिडियरी टाटा डिजिटलने सीएससी ग्रामीण स्टोअरमधील 1.5 हिस्सेदारी खरेदी केली होती. त्याच्यानंतर असा निर्णय एचडीएफसी बँकेने घेतलेला आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण क्षेत्रापर्यंत आपली उत्पादने आणि सेवा पोहोचविण्यासाठी सदरच्या प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्याचा विचार सुरु असल्याचे संकेत आहेत. विशेष करुन आपल्या बँकिंग पोर्टफोलियोला ग्रामीण क्षेत्रात पोहोचविण्यासाठी ही योजना आखत असल्याची माहिती आहे. यासाठी बँकेने ग्रामीण ई-स्टोअरमधील हिस्सेदारीची खरेदी केली आहे.

मागच्या वर्षी लाँचिंग

सीएससी ई-गव्हनर्स सर्व्हिसेस इंडियाने मागील वर्षी ग्रामीण ई-स्टोअर सादर केले होते. या स्टोअरवर स्थानिक हँडीक्राफ्ट, ग्रॉसरीज आणि कंझ्युमर डय़ुरेबलची विविध प्रकारातील उत्पादने उपलब्ध केली आहेत. सादरीकरणाच्या एक वर्षाच्या आतच ग्रामीण ई-स्टोअरचा महसूल हा 250 कोटी रुपयाच्या घरात पोहोचला आहे.

4 लाख कॉमन सर्व्हिस सेंटरमधून सेवा

ग्रामीण ई-स्टोअर 4 लाख कॉमन सर्व्हिस सेंटर(सीएससी)च्या आधारे या सेवा देत आहे. सदरचे कॉमन सर्व्हिस सेंटर इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड आयटी मंत्रालयाच्या आधारे चालविण्यात येते. एचडीएफसी बँकेच्या व्यतिरिक्त टाटा क्रोमा, पेप्सी, कोका कोला, भारत पेट्रोलियम यासारखे महत्त्वपूर्ण ब्रँड ग्रामीण ई-स्टोअरशी जोडलेले आहेत.

Related Stories

विदेशी बाजारपेठेतही घसरण

tarunbharat

पुढच्या वषी वनप्लसचे स्मार्टवॉच

Patil_p

जागतिक बाजारातील संकेतामुळे तेजीची झुळूक

Patil_p

ऍक्सीस बँकेचा हय़ुंडाईशी करार

Patil_p

शेअर बाजारात मोठी पडझड

datta jadhav

नेस्ले ‘कार्बन उत्सर्जना’वर 3.6 अब्ज डॉलर्स खर्चणार

Patil_p
error: Content is protected !!