तरुण भारत

अखेर पेट्रोलने गाठली शंभरी

प्रतिनिधी / सावंतवाडी:

पेट्रोलने शंभरी तर डिझेलने नव्वदी गाठली आहे. पेट्रोल, डिझेल दराच्या भडकलेल्या दराने आता महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारोनाने त्रस्त झालेल्या जनतेला या दरवाढीचा आणखी फटका बसून अर्थचक्रही बिघडणार आहे.

Advertisements

पेंट्रोलचा दर गेले काही दिवस 98 रुपयापर्यत घुटमळत होता. मात्र, गेल्या तीन दिवसात झालेल्या दरवाढीमुळे तो सावंतवाडीसारख्या शहरात शंभरपर्यत झाला आहे. सावंतवाडीत पेट्रोलचा दर 99 रुपये 87 पैसे झाला आहे. त्यामुळे पेट्रोलने अखेर शंभरी गाठल्याचे येथील जनतेला पहावयास मिळाले. डिझेलनेही नव्वदी गाठली आहे. डिझेलचा दर 89.83 रुपये प्रति लीटर झाला आहे. पेट्रोल, डिझेलच्या भडक्याने अगोदरच महागाईने आणि कारोनाने त्रस्त झालेल्या जनतेला आणखी फटका बसणार आहे. माल वाहतुकीचे दर वाढल्याने भाजीपाला, तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढणार आहेत. सध्या लॉकडाऊन आणि इतर निर्बंधामुळे पेट्रोल, डिझेलची मागणी घटली आहे. त्यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी आणि महसुलासाठी ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येते. परंतु, सध्या सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने जनतेला खासगी वाहतुकीवर अवलंबू रहावे लागत आहे. त्यामुळे या दरवाढीचा फटका जनतेलाच जास्त बसणार आहे.

Related Stories

आंगणेवाडी भराडी माता यात्रोत्सव 6 मार्च रोजी

NIKHIL_N

भालचंद्र महाराज जन्मोत्सव सोहळा सजावट स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद 

triratna

राजापुरात व्यापाऱयांची फलकबाजी

Patil_p

आरटीपीसीआर केलेल्या कर्मचाऱयांना पाठविले डय़ुटीवर

NIKHIL_N

खेडमध्ये फ्लॅटला लागलेल्या आगीत दोन लाखांचे नुकसान

Patil_p

रत्नागिरी : सरपंच पदाची आरक्षण सोडत 15 डिसेंबर रोजी

triratna
error: Content is protected !!