तरुण भारत

भारत 56 लाख टन साखर निर्यात करणार

निर्याती संदर्भात करण्यात आले करार – एआयएसटीए यांच्याकडून माहिती

नवी दिल्ली

Advertisements

 साखर उद्योगाची संघटना ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन (एआयएसटीए) यांनी दिलेल्या माहितीनुसार भारताने 2020-21 च्या व्यापारी सत्रात आतापर्यंत 56 लाख टन साखर निर्यात करण्यासाठी करार केले असल्याची माहिती आहे. यातील चार लाख टनासाठी लवकरच व्यवहार होणार असल्याची माहितीही यावेळी दिली आहे.

सरकारने 2020-21 सत्रात (ऑक्टोबर-सप्टेंबर) साठी 60 लाख टन अतिरिक्त साखरेच्या निर्यातीचे ध्येय निश्चित केले आहे. या निर्यातीला जानेवारीमध्येच मंजुरी देण्यात आली होती. भारताने 2019-20 या सत्राच्या दरम्यान 59 लाख टन साखर निर्यात केली होती.  एआयएसटीएच्या ताज्या आकडेवारीनुसार 56 लाख टन निर्यातीसाठी करार केला आहे. यामध्ये 34.78 लाख टन साखर सहा मेपर्यंत 12 देशांना पाठविण्यात आली असल्याची माहिती आहे.

साखर निर्यात केलेले देश

यादरम्यान इंडोनेशियाला 12.17 लाख टन, अफगाणिस्तानला 4.33 लाख टन आणि यूएईला 3.66 लाख टन इतकी साखर पाठविण्यात आली असल्याची माहिती आहे.

Related Stories

जूनपर्यंत नोंदणीकृत कंपन्यांची संख्या 20.14 लाखाच्या घरात

Patil_p

स्टेट बँक 14 हजार जणांची भरती करणार

Patil_p

मारूती सुझुकीची नवी सेलेरियो दाखल

Patil_p

बाजारातील चार सत्रातील तेजीचा प्रवास थांबला

Patil_p

कर्जासाठी आयबीएचा नवीन प्रस्ताव

Patil_p

वाहन-आरोग्य विम्यांचे हप्ते मुदत वाढविली

Patil_p
error: Content is protected !!