तरुण भारत

नकारात्मक वातावरणामुळे सेन्सेक्स घसरणीत

सेन्सेक्स 340.60 तर निफ्टी 91.60 अंकांनी प्रभावीत

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील मागील चार सत्रातील तेजीला अखेर विराम मिळाला आहे. यामध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक दिवसअखेर 341 अंकांनी घसरुन बंद झाला आहे. प्रमुख कंपन्यांपैकी एचडीएफसी बँक, एचडीएफसी, कोटक बँक आणि टीसीएस यासारख्या निर्दाशांकातील घसरणीमुळे शेअर बाजार प्रभावीत झाल्याचे पहावयास मिळाले आहे.

दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स 340.60 अंकांनी म्हणजे 0.69 टक्क्यांनी घसरुन निर्देशांक 49,161.81 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 91.60 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 14,850.75 वर बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे.

मंगळवारच्या सत्रात प्रामुख्याने कोटक बँकेचे समभाग हे सर्वाधिक तीन टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. यासोबत एचडीएफसी, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि टायटन यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला मात्र एनटीपीसी, ओएनजीसी, पॉवरग्रिड कॉर्प, सन फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट आणि स्टेट बँक यांचे समभाग नफा कमाईत राहिल्याचे दिसून आले आहे.

जागतिक पातळीवरील प्रमुख घडामोडींमध्ये विविध देशांमधील वाढती महागाई आणि कोरोनासह अन्य घटनांच्या प्रभावामुळे भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार चिंतेत असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. कारण भारतामध्ये कोरोना लाटेचा धोका अधिक वाढत असल्याने असे वातावरण निर्माण होत असल्याचे काही तज्ञांनी म्हटले आहे. अन्य बाजारांपैकी हाँगकाँग, टोकीओ आणि  सोल हे बाजार घसरणीत राहिले, तर शांघाय मात्र नफ्यात राहिल्याची नेंद आहे.

Related Stories

‘बेंगळूर’ची वाटचाल मजबूत टेक्नॉलॉजी केंद्राकडे

Patil_p

सुरुवातीची तेजी गमावत सेन्सेक्सची घसरण

Patil_p

समभाग लिलावामुळे सेन्सेक्सची घसरण

Patil_p

भारत फोर्जचा पॅरामाउंट ग्रुपशी करार

Patil_p

जनरल मोटर्सला प्रकल्प विकण्यास होणार विलंब?

Patil_p

हिंदुस्थान युनिलिव्हरचा नफा 41 टक्क्यांनी वधारला

Amit Kulkarni
error: Content is protected !!