तरुण भारत

केरळमध्ये गौरी अम्मा यांचे निधन

राज्याच्या राजकारणातील ‘आयर्न लेडी’

वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम

Advertisements

केरळच्या राजकारणात नेहमीच आयर्न लेडी या नावाने ओळखले गेलेल्या गौरी अम्मा यांनी एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. वृद्धत्वामुळे उद्भवलेल्या आजारांवरील उपचारासाठी त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 1957 मध्ये जगातील पहिल्या लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेल्या कम्युनिस्ट सरकारच्या मंत्रिमंडळात त्या सामील होत्या.

मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी दिवंगत गौरी अम्मा यांना श्रद्धांजली वाहून त्यांना एक साहसी योद्धय़ा संबोधिले आहे. गौरी अम्मा यांनी स्वतःचे जीवन शोषण आणि अत्याचार संपविण्यासाठी आणि उत्तम समाजाच्या स्थापनेकरता वाहिले असल्याचे विजयन यांनी म्हटले आहे.

14 जुलै 1919 रोजी केरळच्या अलाप्पुझा जिल्हय़ातील पट्टनक्कड येथे जन्मलेल्या गौरी अम्मा यांनी तिरुअनंतपुरम येथील शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले होते. केरळच्या पहिल्या विधानसभेपासून सुरुवात करणाऱया गौरी अम्मा 1977 मध्ये पराभूत झाल्या होत्या. पण पुढील निवडणुकीत विजयी झाल्या आणि 2006 पर्यंत त्या आमदार म्हणून कार्यरत होत्या. गरीबांना भूमी सुनिश्चित करण्यासाठी लागू केलेल्या भूमी सुधारणा विधेयकाची सुरुवात त्यांनीच केली होती. विविध सरकारांमध्ये त्यांनी मंत्री म्हणून कार्य केले होते.

दीर्घ राजकीय कारकीर्दीत त्या 16 वर्षांपर्यंत कम्युनिस्ट तर काँग्रेसच्या 6 कॅबिनेटमध्ये त्या मंत्री होत्या. गौरी अम्मा यांनी 1994 मध्ये पक्षविरोधी कारवायांसाठी पक्षातून बाहेर काढण्यात आले हेते. यामुळे त्यांनी जनाधिपति समृद्धी समितीची स्थापना केली होती. त्यानंतर गौरी अम्मा यूडीएफमध्ये सामील झाल्या. 2011 मध्ये त्यांनी निवडणूक लढविली होती, पण त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

Related Stories

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणासह अनेक मुद्द्यांवर चर्चा, पंतप्रधानांकडून सकारात्मक निर्णयाची आशा : मुख्यमंत्री

triratna

पंतप्रधानांची आढावा बैठक सुरु ; मोठ्या निर्णयांची शक्यता

Shankar_P

पाचवी बैठक निष्फळ; कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम

datta jadhav

हिंदू राष्ट्रासाठी अयोध्येतील परमहंस दास करणार आमरण उपोषण

datta jadhav

पाक सैन्यांच्या गोळीबारात भारतीय लष्कराचा JCO शहीद

datta jadhav

शोपियां चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav
error: Content is protected !!