तरुण भारत

धूम्रपान सोडण्यासाठी डोकं पिंजऱयात कैद

बायकोकडे असते चावी

काही सवयी अत्यंत वाईट असतात, धूम्रपान याचपैकी एक आहे. अनेक लोक धूम्रपान सोडण्याचा निश्चय करतात, पण काही दिवसांनी त्यांचा निश्चय ढळू लागतो. तसेही व्यसन सहजासहजी सुटत नसते. पण काही लोक या व्यसनांपासून मुक्ती मिळविण्यासाठी विचित्र मार्ग अवलंबत असतात. अशाच एका व्यक्तीने धूम्रपानापासू दूर राहण्यासाठी स्वतःच्या डोक्याला एका विशेषप्रकारच्या पिंजऱयात कैद केले आहे.

Advertisements

तुर्कस्तानातील इब्राहिम युसेल अनेक वर्षांपासून धूम्रपान करत होते. पण धूम्रपान सोडण्याचा निर्धार केला असता त्यांना मोठा त्रास झाला. पण त्यांनी हार न मानता एका विशेषप्रकारच्या हेल्मेटने स्वतःचे डोकं आच्छादले आहे, जेणेकरून चुकूनही स्वतःच्या तोंडात सिगारेट धरता येऊ नये.

इब्राहिम यांना मोटरबाइक रायडर्सच्या हेल्मेटमधून या पिंजऱयाची कल्पना सुचली, जे त्यांनी स्वतः 130 फूट कॉपर वायरच्या मदतीने तयार केले आहे. पण इब्राहिम यांनी हे हेल्मेट काहीसे वेगळे तयार केले आहे. बाइक रायडर्स हवे तेव्हा स्वतःचे हेल्मेट उतरवू शकतात. पण इब्राहिम यांना स्वतःचे हेल्मेट उतरविण्यासाठी चावीची गरज भासते, जी त्यांच्या कुटुंबीयांकडे असते.

वयाच्या 16 व्या वर्षापासून इब्राहिम प्रतिदिन 2 पाकिटे सिगारेट ओढत आहेत. पण फुफ्फुसांच्या कर्करोगामुळे त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यावर त्यांनी कुटुंब आणि चांगल्या प्रकृतीसाठी धूम्रपानापासून अंतर राखण्याचा निर्णय घेतला आहे. इब्राहिम यांचे हेल्मेट एखाद्या पक्ष्याच्या पिंजऱयासारखे असून ते केवळ खाताना-पिताना उतरवितात. पण हे हेल्मेट उतरविण्यासाठी त्यांना स्वतःची पत्नी किंवा मुलांची मदत घ्यावी लागते, कारण त्याची चावी त्यांच्याकडे असते.

Related Stories

दफनभूमीत जोडप्याचे प्री-वेडिंग फोटोशूट

Amit Kulkarni

अंटार्क्टिकामध्ये पहिल्यांदाच उतरले एअरबस ए340

Patil_p

अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात होण्याऱ्या उपासमारीला रोखा: UN प्रमुख

Abhijeet Shinde

2 कोटी बंदुकांची विक्री

Patil_p

स्पेन : लसीकरण दृष्टीपथात

Patil_p

भारताने घाईत हटविले निर्बंध

Patil_p
error: Content is protected !!