तरुण भारत

सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांवर स्कायडायव्हिंगद्वारे उपचार

रशियात फ्लाय विथ मी प्रकल्प

रशियात सुमारे 85 हजार मुले सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त आहेत. हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असून जो मुलांची शारीरिक गती, चालण्या-फिरण्याच्या क्षमतेला प्रभावित करतो. आता अशा मुलांची क्षमता वाढविण्यासाठी रशियात स्कायडायव्हिंगची मदत घेतली जात आहे.

Advertisements

याच मुलांपैकी एक आहे 13 वर्षीय मैरीन डोलिक. या मुलाला रशियाच्या ‘फ्लाय विथ मी’ प्रकल्पात भाग घेण्यासाठी निवडण्यात आले आहे. हा प्रकल्प सेरेब्रल पाल्सीने पीडित मुलांना त्यांच्या शारीरिक क्षमतांमध्ये सुधारणा घडवून आणण्यास मदत करतो. डोलिकने आता इनडोअर स्कायडायव्हिंग सिम्युलेटरमध्ये उडणे शिकून घेतले आहे. मी आता योग्यप्रकारे चालणे शिकलो आहे. मी मजबूत झालो असून हिमतीने सर्व कामे करतो. मी कुणाच्याही मदतीशिवाय स्वबळावर बरंच काही करू इच्छितो असे तो सांगतो.

भविष्यात एक इनडोअर स्कायडायव्हिंग प्रशिक्षक होण्याचे त्याचे स्वप्न आहे. तीन आठवडय़ांच्या प्रशिक्षणात डोलिकमध्ये खूपच सुधारणा दिसून आली असल्याचे त्याचे आई इरीना यांनी म्हटले आहे. युरोप आणि अमेरिकेत अशा मुलांवरील उपचारासाठी स्कायडायव्हिंगचा वापर पूर्वीपासूनच केला जात आहे.

रशियात सेरेब्रल पाल्सीने पीडित मुलांवर उपचार मालिशने केला जात राहिला आहे. सिम्युलेटर उड्डाणांमुळे दैनंदिन जीवनात वापरल्या न जाणाऱया सांधे आणि स्नायूंना काम करण्यास मदत मिळत असल्याचे फिजिशियन वालिदा इसानोवा यांनी म्हटले आहे.

पण प्रकल्पाला वैज्ञानिक आधार देण्यासाठी अधिक अध्ययनाची गरज आहे. फ्लाय विथ मी प्रकल्प चालविणाऱया येकातेरिना इनोजेमेत्सेवा स्वतःच्या सेरेब्रल पाल्सीने पीडित मुलीच्या आई आहेत. आतापर्यंत 5 ते 14 वर्षांच्या वयोगटातील 120 मुलांची याकरता निवड करण्यात आली आहे.

1 तासांचे प्रशिक्षण 29 हजारांमध्ये

रशियात सुमारे 85 हजार मुले सेरेब्रल पाल्सीने पीडित आहेत. त्यांना सिम्युलेटर स्कायडायव्हिंगने लाभ होत असला तरीही काही कुटुंबे याचा खर्च पेलू शकत नाहीत. सिम्युलेटर स्कायडायव्हिंगकरता एका तासाला 29 हजार रुपये खर्च होतात.

Related Stories

कोरोनाबाधित नेत्यांच्या यादीत डोनाल्ड ट्रम्प

Patil_p

काहीही हा ‘क्षी’!

Patil_p

चीनकडून भारतीय वेबसाईट, वृत्तपत्रांवर बंदी

datta jadhav

रोहिंग्याचा शरणार्थीचा कोरोनामुळे मृत्यू

Patil_p

तुर्कस्तान-फ्रान्स यांच्यात व्यंगचित्रयुद्ध

Omkar B

सिनेटमध्ये महाभियोगाचा प्रस्ताव

Patil_p
error: Content is protected !!