तरुण भारत

अमेरिकेत मुलांचेही होणार लसीकरण

12-15 वयोगटातील मुलांसाठी लसीला मंजुरी- परीक्षणात 100 टक्के प्रभावोत्पादक

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन

Advertisements

अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनने (युएस-एफडीएफ) 12-15 वर्षांच्या मुलामुलींसाठी फायजर-बायोएनटेकच्या कोरोना लसीला मंजुरी दिली आहे. ही लस आतापर्यंत 16 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना देण्यात येत होती. यापूर्वी कॅनडाने मुलांच्या या पहिल्या लसीला मंजुरी दिली आहे. सुरळीत जीवनाकडे परतण्याच्या प्रयत्नात असलेल्या लाखो अमेरिकेन कुटुंबांना हा एक मोठा दिलासा आहे. 12-15 वर्षांच्या मुलांच्या लसीकरणामुळे अमेरिकेत मोठय़ा संख्येत शाळा आणि समर कँप खुल्या होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे मानले जात आहे.

अमेरिकेत कोरोना लसीकरणासाठी केवळ एफडीएफची अनुमती पुरेशी नाही. सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनची (सीडीसी)  एक सल्लागार समिती लसीच्या परीक्षणाशी संबंधित डाटाची समीक्षा करणार आहे. त्यानंतरच 12-15 वयोगटातील मुलांना लस देण्याचा सल्ला देणार आहे. सीडीसीची समिती देखील मुलांच्या लसीकरणाला अनुमती देणार असल्याचे मानले जात आहे. प्रौढांना देण्यात येणाऱया लसीचा डोस मुलांना देणे सुरक्षित असल्याचे वैद्यकीय परीक्षणात स्पष्ट झाले आहे.

100 टक्के प्रभावोत्पादक

वैद्यकीय परीक्षणादरम्यान फायजर-बायोएनटेकने 12-15 वयोगटातील 2,260 मुलांना  लसीचे दोन डोस देण्यात आले, यातील काही जणांना 3 आठवडय़ांच्या फरकाने प्लेसिबो डोस देण्यात आले होते. संशोधकांना यादरम्यान लक्षणेयुक्त 18 कोरोनाबाधित आढळले पण ही सर्व जण प्लेसिबो शॉट घेतलेली मुले होती. या परीक्षणातून लस 100 टक्के उपयुक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. लस घेतलेल्या सुमारे 20 टक्के मुलांना ताप आला, तर 16 ते 25 वर्षांच्या वयोगटात 17 टक्के जणांना ताप आला होता. 12-15 वर्षांच्या मुलांमध्ये इम्यून रिस्पॉन्स 16-25 वयोगटापेक्षा अधिक चांगला होता.

2-11 वयोगटासाठी लवकरच लस

फायजर-बायोएनटेकने मार्च महिन्यात 5-11 वर्षांच्या मुलांवर लसीचे परीक्षण सुरू केले होते. तर एप्रिलमध्ये त्यांनी 2-5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी लसीचे परीक्षा सुरू केले होते. परीक्षणाचे निष्कर्ष सकारात्मक असतील असे दोन्ही कंपन्यांचे मानणे आहे. याचमुळे त्यांनी सप्टेंबरमध्ये 2-11 वयोगटातील मुलांकरता लसीला अनुमती मिळावी यासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे.

6 महिन्याच्या बाळावरही परीक्षण

फायजर-बायोएनटेक लवकरच 6 महिन्यांपासून 2 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी लसीचे परीक्षण सुरू करणार आहे. हे परीक्षण यशस्वी ठरल्यास जगात पहिल्यांदाच नवजातापासून वृद्धांसाठी कोरोनाची लस उपलब्ध होणार आहे.

अन्य कंपन्याही शर्यतीत

12-17 वर्षांपर्यंतच्या किशोरवयीनांसाठी मॉडर्नाच्या लसीच्या परीक्षणाचे निष्कर्ष पुढील आठवडय़ात प्राप्त होणार आहे. तर 6 महिन्यांपासून 12 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी झालेल्या वैद्यकीय परीक्षणाचे निष्कर्ष जुलैनंतर प्राप्त होऊ शकतात. ऍस्ट्राजेनेका देखील 6 महिने आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी लसीचे परीक्षण करत आहे. जॉन्सन अँड जॉन्सनसुद्धा मुलांवरील लसीच्या वैद्यकीय परीक्षणाच्या योजनेवर काम करत आहे. नोवावॅक्सने 12-17 वयोगटातील 3 हजार मुलामुलींवर स्वतःच्या लसीचे परीक्षण सुरू केले आहे. हे परीक्षण 2 वर्षांपर्यंत चालणार आहे.

भारत मात्र पिछाडीवर

भारत बायोटेक कंपनीने फेब्रुवारीमध्ये कोव्हॅक्सिनच्या परीक्षणात मुलांना सामील करण्याची अनुमती मागितली होती, पण यंत्रणेकडून अनुमती नाकारण्यात आली होती. त्यानंतर भारतात अद्याप कुठल्याच कंपनीने मुलांच्या लसीचे परीक्षण हाती घेतलेले नाही. फायजर-बायोएनटेकच्या लसीला युरोपमध्ये मुलांकरता मंजुरी मिळाल्यावरच भारतात ड्रग कंट्रोलर यासंबंध्दी विचार करू शकतात असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Related Stories

कोरोनाबाधितांसाठी रक्तदाबाची औषधे सुरक्षित

Patil_p

‘या’ लसीबाबत संभ्रम कायम; अनेक देशात निर्बंध

datta jadhav

अमेरिकेत कोरोनाबधितांची संख्या 4 लाखांवर, 24 तासात 2 हजार मृत्यू

prashant_c

…म्हणून वॉरेन बफेट यांनी विकले सर्व सोने

datta jadhav

मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या 1.18 लाखांवर

datta jadhav

आफ्रिकेतील देशात पसरला इबोला विषाणू

Patil_p
error: Content is protected !!