तरुण भारत

आयपीएल स्पर्धेसाठी इंग्लंडचे खेळाडू उपलब्ध होण्याची शक्यता कमी

वृत्तसंस्था/ लंडन

भारतातील 2021 ची आयपीएल क्रिकेट स्पर्धा कोरोना महामारी समस्येमुळे अर्धवट स्थितीत तहकूब करण्यात आली असून सदर स्पर्धा पुन्हा दुसऱया ठिकाणी खेळविली गेली तर इंग्लंडचे क्रिकेटपटू उपलब्ध होण्याची शक्यता कमी राहील, असे प्रतिपादन इसीबीचे क्रिकेट संचालक ऍश्ले जाईल्स यांनी केले आहे.

Advertisements

अर्धवट स्थितीत तहकूब करण्यात आलेली 2021 ची आयपीएल क्रिकेट स्पर्धा चालू वर्षांमध्ये दुसऱया ठिकाणी खेळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी इंग्लंडचे क्रिकेटपटू उपलब्ध राहू शकणार नाहीत. कारण जून महिन्यानंतर इंग्लंडचा क्रिकेट कार्यक्रम भरगच्च असल्याचे जाईल्स यांनी सांगितले. आयपीएल स्पर्धेचा उर्वरित भाग येत्या सप्टेंबरच्या उत्तरार्धात खेळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ऑक्टोबर-नोव्हेबर दरम्यान होणाऱया आयसीसीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी अर्धवट स्थितीतील आयपीएल स्पर्धा घेण्यासाठी बीसीसीआयचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान इंग्लंडचा संघ बांगलादेश आणि पाकच्या दौऱयावर जाणार आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाबरोबर ऍशेस मालिकेत खेळणार आहे. त्यामुळे इंग्लंडचे क्रिकेटपटू आयपीएल स्पर्धेत उपलब्ध होवू शकणार नाहीत. 2021 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचे 11 क्रिकेटपटू विविध संघांकडून खेळत होते. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका जूनमध्ये खेळविली जाणार आहे.

Related Stories

श्रीकांत, सिंधु यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

Amit Kulkarni

ओडिशा एफसी संघाचा ऑनवेयुशी करार

Patil_p

मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताला दोन सुवर्ण पदके

Patil_p

सायनाचे आव्हान संपुष्टात, कृष्णा-विष्णू अंतिम फेरीत

Patil_p

न्यूझीलंडच्या वर्ल्ड कप संघाची घोषणा

Amit Kulkarni

मेस्सीच्या गोलसह पीएसजीची सिटीवर मात

Patil_p
error: Content is protected !!