तरुण भारत

एमसीसीने फेटाळली ‘बांबू बॅट’ची संकल्पना

विलो बॅटीला तूर्तास पर्याय नाही, बांबू बॅट वापरणे बेकायदेशीर होईल, असा पवित्रा

लंडन / वृत्तसंस्था

Advertisements

सध्या क्रिकेटचे जे प्रचलित नियम आहेत, त्यात बांबू बॅटची संकल्पना अजिबात बसत नाही. मुळात, क्रिकेटमध्ये बांबू बॅटचा वापर करणेच बेकायदेशीर होईल. त्यामुळे, ही संकल्पना आम्ही फेटाळत आहोत, असे मेरिलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) मंगळवारी जाहीर केले आणि मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या बांबू बॅटच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला. अर्थात, तूर्तास ही संकल्पना फेटाळली असली तरी भविष्यात कायदा उपसमित्यांच्या बैठकीत यावर जरुर चर्चा केली जाईल, असे अभिवचन एमसीसीने यावेळी आवर्जून दिले.

केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचे दर्शिल शाह व बेन टिंकलर-डेव्हिस यांनी बांबूपासून बनवलेली बॅट आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर आणि विलो बॅटपेक्षा अधिक मजबूत असतात, असा दावा केला होता. सध्याच्या पारंपरिक बॅटस् इंग्लिश किंवा काश्मीर विलोच्या लाकडापासून तयार केल्या जातात आणि त्याला बांबू बॅटचा पर्याय अधिक उत्तम ठरु शकतो, असा दर्शिल व बेन यांचा दावा होता. त्या पार्श्वभूमीवर एमसीसीने आपली बाजू स्पष्ट केली व या उभयतांचा दावा येथे पूर्णपणे फेटाळून लावला.

क्रिकेटमधील नियमांचे काटेकोर पालन होते आहे का, याची खातरजमा करण्याची जबाबदारी एमसीसीची असून यामुळे त्यांना खेळाचे प्रशासक म्हणून ओळखले जाते.

‘आयसीसी नियमबुकातील 5.3.2 ही तरतूद अशी सांगते की, बॅटची ब्लेड ही पूर्णपणे फक्त लाकडापासूनच तयार केलेली असावी आणि बांबूचा (गवती प्रकारातील असल्याने) यात विचार करता येणार नाही. अपवादात्मक परिस्थितीत हा बदल करणे भाग आहे, असे गृहित धरले तर मूळ नियमात व्यापक फेरबदल करावे लागतील’, असे एमसीसीने पत्रकातून नमूद केले.

‘मुळात गवती प्रकारात मोडणाऱया बांबूचा विलोला पर्याय म्हणून स्वीकारता येत नाही. कनिष्ठ गट वगळता अन्य सर्व गटात बॅटचे लॅमिनेशन करता येत नाही. हा देखील यातील आणखी एक अडथळा आहे’, याचा त्यांनी उल्लेख केला. विलो बॅटच्या तुलनेत बांबू बॅट अधिक कणखर, मजबूत ठरते, असा दावा दर्शिल व बेन यांनी केला होता. पण, बॅट व बॉल यातील समतोल बिघडणार नाही, याची दक्षता घेणेही तितकेच गरजेचे असल्याचे एमसीसीने स्पष्ट केले.

‘विलोला आणखी काही पर्याय असू शकतात का, याबद्दल कायदा उपसमित्यांच्या पुढील बैठकीत चर्चा केली जाईल. याशिवाय, जगभरातील विविध भागात कुठे कमी खर्चात बॅटची निर्मिती करुन मिळू शकेल, याचीही चाचपणी केली जाणार आहे. यासाठी संशोधन महत्त्वाचे ठरेल’, याचा त्यांनी शेवटी उल्लेख केला आहे. 

काय आहे बांबू बॅटची संकल्पना?

केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतील दर्शिल शाह व बेन टिंकलर-डेव्हिस यांनी विलो बॅटऐवजी बांबू बॅटची संकल्पना मांडली होती. विलोपेक्षा बांबू लाकूड अधिक किफायतशीर ठरु शकते आणि ते मुबलक मिळू शकते, असा दावा त्यांनी यावेळी केला होता. मात्र, आयसीसीच्या नियमबुकात बॅट विलो लाकडापासून बनवलेली असावी, असे नमूद आहे आणि एमसीसीने तोच धागा पकडत ही संकल्पना फेटाळून लावली.

‘स्वीट स्पॉट’मधील फरक महत्त्वाचा, काय असतो ‘स्वीट स्पॉट’?

बॅटीच्या तळाच्या बाजूने वर 4 ते 12 इंचांपर्यंतच्या दरम्यानचा भाग हा स्वीट स्पॉट या अर्थाने ओळखला जातो. बॅटीवरील तीन डॉटने ही स्वीट स्पॉटची जागा निश्चित होते. स्वीट स्पॉटच्या साहाय्याने चेंडू फटकावला गेला तर तो अधिक वेगाने जातो. त्यामुळे, या स्वीट स्पॉटचा पुरेपूर वापर करण्याचा फलंदाजांचा प्रयत्न असतो. विलो बॅटपेक्षा बांबू बॅटचा स्वीट स्पॉट अधिक कणखर ठरतो, असा केम्ब्रिजच्या रिसर्चर्सचा दावा होता. पण, बॅट व चेंडू यांच्यातील समतोलाला कुठेही धक्का बसू नये, यासाठी हा बदल करणे शक्य नसल्याचे देखील एमसीसीने येथे स्पष्ट केले आहे.

पारंपरिक विलो बॅटीपेक्षा बांबू बॅट 40 टक्के अधिक वजनदार

दर्शिल व बेन यांनी सुचवलेल्या पर्यायानुसार, बांबू बॅटचा विनियोग केला गेला असता तर त्यात सर्वप्रथम वजनाची अडचणही पार करावी लागली असती. पारंपरिक विलो बॅटपेक्षा बांबूची ही बॅट 40 टक्के अधिक वजनदार असते. विलोची बॅट बांबूच्या बॅटपेक्षा 22 टक्के अधिक मजबूत असते. त्यामुळे, बांबू बॅटने फलंदाज अधिक आक्रमक तडाखा लगावू शकतात. अर्थात, मुळातच क्रिकेटमधील नियम फलंदाजांना अधिक पोषक असताना यात आणखी भर पडली असती, हा देखील यातील आणखी एक महत्त्वाचा घटक आहे.

विलो व बांबूची पूर्ण वाढ होण्यास किती अवधी लागतो? विलो झाडाची पूर्ण वाढ होण्यास साधारणपणे 15 वर्षांचा कालावधी लागतो व त्यानंतरच त्याचे लाकूड बॅट तयार करण्यासाठी वापरले जाते. त्या तुलनेत गवती प्रकारात येणाऱया बांबूची वाढ होण्यास मात्र 7 वर्षे पुरेसे ठरतात. चीन, जपान, दक्षिण अमेरिकेच्या काही भागात त्याची पैदास उत्तम असल्याचे दिसून येते, असे दर्शिल शाहने यापूर्वी नमूद केले आहे. विशेष म्हणजे डॉ. दर्शिल शाहने  थायलंडच्या 19 वर्षाखालील संघाचेही यापूर्वी प्रतिनिधीत्व

Related Stories

पाकचा झिम्बाब्वेवर एकतर्फी मालिकाविजय

Patil_p

हरियाणातील दोन महिला कुस्तीपटूंना ऑलिम्पिकचे तिकीट

datta jadhav

फुटबॉल संघांच्या शिबिरासाठी गोव्याची निवड

Patil_p

विंडीज चहापानाअखेर 31 धावांनी आघाडीवर

Patil_p

हाय परफॉर्मन्स डायरेक्टर व्होकर हर्मन यांचा राजीनामा

Omkar B

गुरप्रीत सिंग, संजू वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटू

Patil_p
error: Content is protected !!